मोहित करे तुझा मोगरा ✍️
!!मोहित करे तुझा मोगरा!!
मनात भरतो तुझा मोगरा
केसात माळला सुंदर जरा
गालावर तीळ आकर्षित करे
गधं मोगऱ्याचा नाकात शिरे
केस बांधले गजरा गुंफला
वेडं लावतंय सखी तुच मला
कानातील डूल मोहित फुल
करतंय मनाला प्रेमात गुल
डोळ्यात काजळ मोहित नयनी
हृदयात प्रेम साठलंय मनी
गाली लाली बघताचं हसली
स्वर्गातील अप्सरा तुच दिसली
ओठ गुलाबी नेसली भरजरी
हृदयात कळ देतेस हसरी ©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment