वृक्षारोपण अभंग रचना ✍️2
!!वृक्षारोपण!!
वृक्ष हो लावुन! पाणी देत जाऊ!
सुरक्षित पाहु! जगतांना!!
काळजी घेतली! झाडं वाढे खुप!
वाचवा हो धुप! धरणीची!!
निसर्ग संम्पदा ! हिरवळ सदा!
आरोग्याचा वादा! करतात!!
फळं मिळे गोड! मन हो निर्मळ!
सोसत हो कळ ! झाडें सारी!!
वृक्ष लावु दारी ! अंगणात सारी!
गावात ती भारी! दिसतात!!
पडीत दिसेल! तिथं ते जगवु!
योजना राबवु! झाडे लावा!!
शहर ते गाव! रस्ते शाळा घर!
परिसर भर ! दुतरफा!!
खड्डा हो खोदुन! फळ फुल झाडें!
संम्पदा हो वाढे! निसर्गाची!!
कीर्ती सांगे त्यांची! प्रदीप तो भारी!
लावा रोप सारी! घरोघरी!!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055


Comments
Post a Comment