गझल प्रेम विरह ✍️
!!गझल!!
!!प्रेम विरह!!
मज भाव तुला कळलेच नाही
ठाव कधी मनाचा घेतला नाही
नुसतं बघून का बहर येई
बोलणं तर तुझं काहीच नाही
समजलं पण सांगितलं नाही
मन हे भावनेत गुंतत जाई
देखणं लावण्य नशिबात नाही
दुसराच मागणं घालतं राही
तु प्रेम माझं दुसरा करी राज
मंडपात चढवत तुला साज
प्रेम कोणाचं मागतं कोण तुला
झुलतो तूझ्या आठवणींचा झुला.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055

Comments
Post a Comment