पंढरीची वारी ✍️



!! पंढरीची वारी!!


विठ्ठल विठ्ठल! गजर नामाचा!

भाव हा मनाचा! अंतरंगी!!


संसार हो झाला! भेटू आता चला!

आस हि जीवाला! पंढरीची!!


भजन कीर्तन! फेर धरू संग!

येईल हो रंग ! जीवनाला!!


सुखी होतं मन! स्पर्शानं पावन!

भरते हो मन! दर्शनाने!!


होतं रममाण! गात गुणगान!

देत तुम्हा मान ! पांडुरंग !!


उभा विटेवरी! चंद्र भागे तीरी!

येतो दरबारी ! तुज भेटी!!


सखी सखा दोघं! भक्तीत हो लिन!

वारीत तल्लीन ! विठ्ठलाच्या!!


सोहळा भक्तीचा! मेळा हा लाखोंचा!

अभंग भक्ताचा! गोड माना!!


मुखी नाम देवा! प्रदीप तो सांगे!

सोहळा हो रंगे ! वारीचाचं!!


प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव.

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे