झाड ✍️
!! झाड!!
स्वतः सोसे जीवनात
सावली देत वनात
ऊन वारा थंडी सारी
कार्बन भरे अंगात.
जीवन देतात सृष्टी
ठेवतात दुर दृष्टी
पोसता जीव जीवन
असतात जरी कष्टी.
किडी मुंगी पक्षी प्राणी
झाडं असे बहुगुणी
आरोग्य ते आयुर्वेद
प्राणवायू स्वासातुनी.
देणं हिच त्या संस्कृती
प्राण्यांची घेणं हि नीती
तोडणं फोडणं जाळ
मानवांची हो कुनीती.
फळे शुद्ध हो गोमटी
असतात खाण्या साठी
निसर्ग सौदंर्य सारं
खुलवता वृक्ष मोठी.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055

Comments
Post a Comment