सुविचार
आयुष्य
क्षणभंगूर आयुष्य जगतांना कीर्तीत उरलं पाहिजे असं जगून घेऊ.
चंद्र
मधुर जसं पडतं चंद्र तेज जीवन असावं अगदी तसंच शांत संयमी सत्व सत्यशील तेज.
सूर्य
दैदीप्यमान सौर मालेला पुरवतो प्रकाश असाच सूर्य जन्माला यावा मानवात.
भूमी
भु माता सृष्टी दाता घटक जीव तत्वातील ती स्वता.
निसर्ग
धरतीवरील स्वर्ग तोची अचल जीव निसर्ग.
लेखणी
कृपा सरस्वती लेखणी जगतांना देतेच यश गेल्यावर कीर्तीत उरे दाखवतं लिहलेलं सुयश.
तारे
छोटी मोठी असतात अंनत तारे आपणही त्यात राहूतका बघा जगतांना रे.
वारे
होत्याचं नव्हतं करतात काही वारे पण आपण होऊ स्वास जगवण्या जीव रे.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर.
Comments
Post a Comment