करूया सुरवात नव्याने ✍️क्र 2
करूया सुरवात नव्याने
धो धो पावसानं झोडपलं
वाटलं मनी ढग फुटलं
पेरलेलं सारेच गेलेलं
शेत शिवार एक झालेलं.
घर दार पाण्यात गेलेलं
अन्न नाही खाण्या उरलेलं
संकट चौफेर घेरलेलं
पिण्या पाणी पण सरलेलं.
का करावं सुचेना झालेलं
कर्ज उभारून पेरलेलं
हिरवं रान बहरलेलं
क्षणात सारंचं सम्पलेलं.
दुःख मनात हो दाटलेलं
हेच पाचवीला पूजेललं
तरी घेतोय पुन्हा भरारी
पुन्हा उभारणं ठरलेलं.
आस कास तीच सारी
करूयात सुरवात नवी
शेतकरी झुंज देतो रोज
नवं सोनं वाट उगवावी.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment