गणपत वाणी बिडी पिताना ✍️

 गणपत वाणी बिडी पिताना

भूतकाळाच्या आठवणी काढी

काय होतो आपण काय झालो

निर्विकार शून्यात धुर सोडी


धष्ट पुष्ट होता धडधाकड गडी

लागलं व्यसन  वोढायचं बिडी

राजबिंडा धुर ओठातून काढी

त्याची मती झाली होती वेडी.


लागली होती संसाराची गोडी

पत्नी होती साधी त्याची भोळी

सुखी संसार राबे घोडा गाडी

व्यस्त धुराळ्यात झाली राख रांगोळी.


अस्थी पंजर झाला आता देह 

गेली लया सारी  व्यसना पाई

लागली आता मरणाची घाई

सोबत आता काही उरलं नाही.©️®️


प्रदीप पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे