करूयात सुरवात नव्याने ✍️

!!करूया सुरवात नव्याने!!


झालं गेलं विसरून जाऊ 

मनातलं आठवून पाहु 

गाणं तेच आपलंच सखी 

दमात नव्याने आता गाऊ.


आनंद पुन्हा भरून घेऊ 

सुर ताल जुळवत राहु

वाद्य तेच वाजवत राहु

सुख शांती त्यात पाहु.


सूर्य येतोचना रोज रोज

ती पिवळी किरणं घेऊन

विसरत कीर्द ती अंधारी 

टाकतोच पृथ्वी उजळून.


किती सुंदर जीव जीवन

बघ बहरलं सारं वन

उन्हात तप्त होऊन सारे

पावसात होतात पावन.©️®️


प्रदीप पाटील 

गणपूर जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे