गणेशाय नमः ✍️
गणेशाय नमः :- काव्य प्रकार काव्य बत्तीशी.
!!गणेशाय नमः!!
गणराया आमुच्या देवा
ध्यानात तुम्ही ठेवा
भक्त भक्तीत लिन रावा
गोड त्याला मानावा.
देईन मोदक आपणा
आशीर्वाद तो हवा
अमूल्य सुखात समृद्धी
वरदान हो ठेवा.
धन लक्ष्मी मनात शांती
तुझ्या मुळे विश्रांती
करतो रोजच आरती
प्रसन्न ठेवी कांती.
विघ्न हर्ता करता धर्ता
सदैवचं सुवार्ता
तुच देवा सृष्टी निर्माता
प्रदीप हा लिहता.
सारं तुचचं फिरविता
जन्म तुझाचं होता
पंचत्तवातून निर्मिता
गणराय देवता.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment