प्रेम तूझ्या वाटेवर
| | प्रेम तूझ्या वाटेवर | |
वाट तुझी महालाची
सुंदर ऐश्वर्यात जगण्याची
राहणी भौतिक सुखाची
तऱ्हा मन मौजेची.
बिनधास्त मस्त वागण्याची
दृष्टीत तूझ्या पडलो
मनात सहज जडलो
पाहून मीही भाळलो.
तरी त्यातून सावरलो
मनानं मागे वळलो
कुटूंबात मनात भरलो
वाटेवरून तूझ्या फिरलो..
अवघड वाट तुझी
कशी जमेल दोस्ती
संपेल कीर्ती माझी
नसावी अशी मस्ती.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

सुंदर भावपूर्ण कविता.
ReplyDelete