Posts

Showing posts from February 1, 2026

समता क्र 2✍️

Image
 समता  विश्व बंधुता रुजवु राज्य सुराज्य घडवु धर्मात भेद पळवु मन साऱ्यांची जुळवु. जाती पाती भेदाभेद  देऊ व्यवस्थेला छेद माणुसकी जपण्याचे लावु सार्यांनाच वेद. प्रदीप पाटील गणपूर. जळगाव मो. 9922239055©️®️

समता क्र. 1

Image
 समता  समता हवी सर्वांना  हक्क सारखाच हवा स्त्री असो वा पुरुष समान करता दावा. कोण करतंय हेवा कोणी करतं दावा एक म्हणतो गाजवा दुसरा सांगे सजवा. जाती पाती नकोतच सांगतात सर्व जण धर्म पंथ जावेतच मानवता हाच सण. कोसळाव्यात या भिंती वाटतं मनात साऱ्या घरी आलं भाऊबंद   भाकरी आपल्या न्याऱ्या. इतरांना देता बोध घेतला जरका शोध राजकीय चाखे मद उच्च नीच करे भेद.   मन एक ओठावर दाखवी सारं सुरेख दुसऱ्याची हवी लेक आपली नात्यात देत. दुसरे चालतं नाहीत स्वतःला म्हणता श्रेष्ठ वागणं असतं दृष्ट सांगणं सर्वांना पष्ट.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जळगाव मो. 9922239055

काजवा क्र. 3

Image
 काजवा  कीर्द काळोख्या रात्री  भयानक सारं वाटे  जेव्हा कुठं हवी साथ  तेव्हा प्रकाश हा थाटे. जीव जीवनात साथी सदा दाखवतो मार्ग  संकट समई धावे  वाटे धरतीचं स्वर्ग.©️®️ प्रदीप पाटील  गणपूर जळगाव मो. 9922239055

काजवा क्र 2✍️

Image
 काजवा  जीव जीवनात सदा  सुख दुःख असतंच  कधी येते कीर्द रात्री  तेज याचं दिसतंच. संकट समय असे मार्ग दाखवता दिसें   रडतांना अश्रु पुसे तोची जीवनात भासे. मन जिथं थांबा घेई तिथं चालना हा देई  बुडत्याला आधार हा संग सोबतीला राही. सुखात सारे सोबती दुःखात धावून येती मनाला आधार देती त्यास काजवा म्हणती.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जळगाव मो. 9922239055

काजवा क्र. 1✍️

Image
 काजवा  भुंगा निशाचर किट  पोटातून उत्सर्जित  प्रकाश किरणं देतो  मादी आकर्षण्या रीत. जाती दोनच हजार अंडी अळी कोष प्रौढ  सुप्त अंडी कोष असे  भुंग्यात प्रजनन ओढ. ओलाव्यात फिरतात हानिकारक मारता खाद्य कीटक खातात  हेच शेतीला तारता. जंगल दिवा असतो जुगनू सारा फिरतो चमक तोची दावतो जीव प्रकाश दावतो.©️®️ प्रदीप पाटील गणपूर. जळगाव मो. 9922239055

मनास झोबतो गारवा ✍️

Image
 " मनास झोबतो गारवा " नेहमीच राया तूमची घाई गारवा सुटलाय लै  अहो थांबा थंडीत शेकोटी पेटलीय शेकून घ्या लै!!धु!!  वाऱ्याला आलं तुफान, थंडी नं घातलं थैमान अंगात हुळहूळी भरली, आहे जरी मी लहान साथ तुमची लाभली, आहे मला अभिमान थांबा जरा शेकोटीवर, ऊब घेऊ दोघं छान.!!1!! या तरुणपणी वेडावलं, हवेत मला संगतीला मजा येईल रात्रीला, सोबत बसु पंगतीला एक ताटात जेवु, खास भरवेल तुम्हाला आनंद मिळेल मनाला, पळवू जरा गारव्याला!!2!! या या थंडीत धुंद मला चढली तुमी मलाच नजरेनं निवडली असंच राहूद्या मांडीवर तुमच्या पडली संधी मिळाली आज थंड मी पडली!!3!! आग जरा लावा तुमची पण  जरा बसा ऊब मिळवु आगीत  रंग भरू आज क्षण गारव्यातले भरल्या विस्तवावर थेंब जरा शिंपडीत.!!4!! प्रदीप पाटील गणपूर जळगाव मो. 9922239055

अग्नी ✍️

Image
  "अग्नी " अग्नी ही देवता! प्रकाश समृद्धी! धन करी रद्धी! संसारात!! ज्वाळा देता सुख! शांतीत प्रकाश! लागतेच आस! शरीराला!! सृष्टी निर्मितीत!पंचतत्व स्थान! असतं बस्तान! शरीरात!! उष्ण करी अंग! वाढवत रंग! ऊर्जा करी संग! जीवनात!! प्रवाह असता! जीव जीवनात! उष्णता अंगात! उभा जीव!! भडकला अग्नी! करतेच भस्म! सारं करी सुष्म! राखेतचं!! अग्नी चाले मंद! होतोच आनंद! गारव्यात छंद! उष्णतेचा!! प्रदिप अंगात! उष्णता असेल! तोवर दिसेल! पृथ्वीवर!!©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव  मो. 9922239055.

आमची माती ✍️

Image
 "आमची माती " आमची माती सोबत आमची माणसं  माणसं देती आनंद माती देते कणसं  कणसं भरता पोट विक्रेता होतो शेट शेट भटजी मजेत शेतकरी जीवनात दारिद्र्य भेट भेट घेता राजकारणी सांत्वन करी थेट थेट मरतोय शेतकरी राजा मस्त खातेय प्रजा प्रजा राहतेय उपाशी राज्यकर्ते असता तुपाशी तुपाशी राहणं गेलं शेतकऱ्यांचं झीझने नशिबात आलं आलं नशिबात कष्ट करणं मातीत गाडणं हेच धोरण धोरण राबवता मारण्याचं तोरण बांधत घरचं©️®️ प्रदीप पाटील गणपूर. जळगाव मो. 9922239055

खळी ✍️

Image
 "खळी " गालावर तुझ्या खळी लावी वेड  मनाचा केला सखी तु गं खेळ  मनाला लागली तुझी ओढ  सांगतं तुला बघायला पळ  घालतं नियमित तुझी गळ मन माझं पण आहे निर्मळ तुझ्या हालचाली वर असे नजर दर्शन घेण्यासाठी काढतो वेळ.©️®️ प्रदीप पाटील गणपूर जळगाव मो. 9922239055

नजर ✍️

Image
" नजर " डोळ्यात तुझे उमटले भाव  खलास झालो आज मी राव  बघतं राहावं वाटतं असंच  घेतं तूझ्या काळजाचा ठाव  कटाक्ष तुझा करतोय हैराण हृदयात मलम तुचं आता लाव   मनात फुलला आहे आनंद आता खाऊ नको तु सुद्धा भाव बघतोय तुझा सुंदर पेहराव प्रेम साजेसे तुझे हावभाव  असंच बघतं राहावे वाटते नजरेतले तुझ्या प्रेम भावते तुझ्या डोळ्यांनी केलं कैद  मिठीत यावं असंच बोलावते  नजरेतूनी करु नको घायाळ प्रेमात तुही आता सुखावते ©️®️ प्रदीप पाटील गणपूर.जळगाव मो. 9922239055

घालत होता माझ्यावर घाव ✍️

Image
  घालतं होता माझ्यावर घाव  थकला बिचारा विसावला सावलीत तोच राव  आजपर्यंत कित्तेक अशीच विसवली माझ्या सावलीच्या पदरात  तरी मानव अशीच पैदास सृष्टीच्या उदरात  आजवर जगणं वृक्ष म्हणून आमचं न बोलता देणंच नशिबात  सजीव सारी जगताय आमच्याच जीवावर तरी का करता आमचाच घात  अचल जीव आमचं आम्ही वाढतो  चल जीव नियमित असंच ओर्बाडतो  खूप मारत गेलेत आजवर असंच जीवांना  सांगणं आहे आता भावांना  कर्म फळ मिळतील त्याची लवकर  मग सुरु होईल सारीच तडफड.©️®️. प्रदीप पाटील  गणपूर जळगाव  मो. 9922239055