दिप पुजन दिवस ✍️
दिप पुजन दिवस देव आषाढी एकादशी च्या नंन्तर चा हा दिवस देव निद्रिस्त अवस्तेत जातात. आषाढ एकदशी दिवशी नंन्तर या दिवस पासून देव झोपली असतांना. त्या दिवसा नंन्तर देवाचे नामस्मरण सदैव करायचं असतं. चार महिने देव झोपलेली असतात. त्या चार महिन्याच्या कालखंडात आषाढ नंतर सर्व देवी देवता श्रावण, भाद्रपद,आश्विन, कार्तिक कार्तिकी जी खोपडी एकादशी असं सुद्धा म्हणतात. तिथं पर्यंत देव देव मानवाने सदैव विविध देवी देवताचे जप करतं नाम घेत तप करायचा असतो असं पुराणात सांगितलंय.त्यांच आषाढ नंन्तर येणारी अमावस्या हि सम्पूर्ण काळी रात्र असते म्हणून जीवनात सुद्धा काळ रात्री येऊ नयेत म्हणून दिप,दिवे, समई नंन्तर पूर्वी काळी कंदील, चिमणी, आकाश कंदील, बत्ती ई.या सारख्या प्रकाश देणाऱ्या सर्व वस्तू पुजन करायचा दिवस सकाळ पासून सुरु होतो. सकाळी देवाचं नाम घेत या घरात,गोठ्यात, अंगणात, रस्त्यावर प्रकाश देणाऱ्या सर्व वस्तू देव देव्हाऱ्यात किंवा त्याच्या बाजूला समोर स्वच्छ करतं सर्व पूजन करायच्या असतात. यांचे पूजन करणं म्हणजेच देव निद्रिस्त झोपली असतांना आपल्याला प्रकाश अमावस्या किंवा रात्री संकटात आपणच मार्ग क...