Posts

Showing posts from March 1, 2026

स्त्री पुरुष शिल्पकार ✍️

Image
 ही 'प्रदीप मनोहर पाटील' यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही जीवनातील महत्त्वाच्या भूमिकेचे वर्णन 'शिल्पकार' म्हणून केले आहे. ​येथे ती कविता पूर्णपणे दिली आहे: ​"स्त्री एक शिल्पकार" ​बीज अंकुरण पोटात गोळा आकार उदरात बाळ रांगती घरात पोषण त्यास छातीत.... ​बोल शिकवी त्यास मग भरवी घास  मग देतं  आधार सोडी प्रथम शाळेत. ​संस्कार माया मनाला सोसून चटके हातास भरवते रोज कुटुंबास नवअलंकार देते त्यास.... ​निर्मितीकार शिल्पकार जननी उपमा अपूर्ण देवास जीव करते साकार वंदन करतो तीस.... ​ "पुरुष एक शिल्पकार" ​बीज उत्कृष्ट पेरली फुलवली सारी धरणी मातीत पाया भरणी नवनिर्मिती जीवन सत्कारणी .. ​राब राब राबतो शूरता वीरता गाजवतो कुटुंब पुढे चालवण्या  पृथ्वी पायी फिरतो... ​कर्तव्य तोच गाजवतो कधी रणांगणात मरतो वैभव तोच निर्मिती कर्ता करविता तो.... ​उत्पत्तीकार असतो तोच स्वप्न करतो साकार हक्का कड्या लढवण्या पेलून खांद्यावर भार... ​त्यालाच सारा भार संघर्षातून उद्धार सोसून अंगावर वार पुरुष देव निर्मितीकार... ​हाच खरा शिल्पकार सृष्टी रचिता वा...