पंढरपूर वारी ✍️
पंढरपूर वारी चालली चालली!वारी पंढरपूरी!! भेटण्या विठ्ठला ! त्याला घरी!! उभा विटेवरी! वाट पाहतोय भक्त तुमी होय! वारकरी !! भेटण्याची आस! दोघांनाहि खास भक्त देवतास ! एकादशी भजन कीर्तन! गात गुण गान! देवा अभिमान! भोळा भक्त बाल साधु संत! जात धर्म पंत जेवता निवांत! एक ताटी! होता गाठी भेटी! यात्रा भरे मोठी चंद्र भागा थाटी ! जलधार ! विठ्ठल रुक्मिणी! भेटण्याची वारी शब्ददिप वरी! लिखाणात!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055