Posts

Showing posts from January 11, 2026

जीव जीवनात वृत्ती प्रवृत्ती ✍️

Image
 "जीव जीवनात  वृत्ती प्रवृत्ती. " जन्म झाला माणुस म्हणून. जीवन जगण्याचं सत्य अनुभवतो. जगतं असतांना अनेक अनुभव येतं असतात. सुख दुःखाच्या हेलकाव्यात मार्गक्रमन करतं असतो. या जन्मात सर्वाथाने लाभ घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ते करतांना तो स्व हित बघत असतो. हित बघता बघता स्वार्थी कधी होतो समजतं नाही. स्वार्थी कितीही असला तरी त्याला प्रत्येकाला वाटतं आपण तर स्वार्थ कधीच करतं नाही हवं तेवढंच बघतो. हवं तेवढंच बघतो घेतो म्हणजे काय? मनुष्य जन्मात हवं ते संपत नाही हाव वाढतच जाते. सकाळी नास्ता केला आता बस दुपारीच जेवणार मला दुसरं काही नको. संध्याकाळी थोडं हवं रात्री बस इतकंच. राहायला घर फिरायला गाडी हवी खिश्यात थोडा पैसा हवा. बॅंकेत थोडे हवेत घरात साऱ्या सुविधा हव्यात बस इतकंच बाकी काही नको. कुठं जाणे फिरणं थोडी मौज मजा हवी बाकी काही नको. इतरांच्या पेक्षा जास्त हवं बस दुसरं काही नको. यालाच तर स्वार्थ स्वहीत म्हणतात. हित जोपसण्या सारी धडपड सदैव सुरूच असते. मानवी मन हे असंच असतं. मानवात सर्व पशु, पक्षी, किडे, मुंगी, जगातील सारे सारे जीव लहान मोठे प्राणी. यांच्या वृत्ती प्रवृत्ती कळतं नकळ...

जीवाची सुंदर अवस्था. ✍️

Image
"जीवाची सुंदर अवस्था." जीव मनुष्य असो वा कोणताही. जीव जीवन जगतं असतांना जीवन कसं जगतोय हे पाहिलं जातं. त्यालाच कर्म म्हटलं जातं. माणुस येतांना फक्त शरीर घेऊन येतो जातांना कर्म सोबत घेऊन जातो. "जसं ज्याचं कर्म तसं त्याचं फळ " असं सर्वच धर्म ग्रंथ सांगतात. म्हणून आपल्या जीवाला मनुष्य देह मिळाला हे आपलं भाग्य. शरीर मनुष्याचं मिळालं तर माणुस म्हणून जगणं तसं कर्म सोबत घेऊन जाणं खुप मोलाचं असतं. देह विरून जातो पण जगलेल्या पाऊलवाटा पुसल्या जातं नाही. कर्मात उरतात. ईतर शिल्लक मनुष्य अन नवीन येणारे जनमानसात कोण कसं जगलं त्याची आठवण ठसा हा शरीर धारी बघत असतात. त्या नुसार चांगलं वाईट वागतं असतात. कसं जगावं ठरवत असतात. पूर्वी होऊन गेलेल्यांचा जसा ठसा हा उमटतो अगदी तसाच ठसा हा जीव जीवन जगतांना सुद्धा मोलाचा महत्वाचा आहे. माणसांच्या माझ्या मतां नुसार सुष्म निर्गुण निराकार हि पहिली अवस्था दुसरी शुक्राणू, तिसरी बीज अंडधारी मादी ज्याला मादी गर्भ म्हणतो त्यात अंडाशय मधील अवस्था. चवथी शरीर घेऊन बाहेर पडणं बाल अवस्था. बाल ते वृद्ध अवस्था ह्या अवस्थे मध्ये तरुण ह्या तीन अवस्थेतून जातं ...

वेळ परिस्थिती ✍️

Image
वेळ आणि परिस्थिती  वेळ आणि परिस्थिती सतत बदलत असते. पृथ्वी जशी फिरतं राहते अगदी तशीच वेळ अन परिस्थिती बदलत राहते. आज जे आहे उदया ते नसेल. आज नव्हे आता जे आहे ते क्षणात बदलत असतं. क्षणा  क्षणात सारं बदलत असतं असंच आहे. भ्रमण संक्रमण सदैव सुरु असणारी प्रक्रिया. म्हणून आज जे अस्तित्व आहे उदया किंवा थोडया वेळात तेच तसंच अस्तिव असेलच असं नाही. म्हणून जे आहे त्यात समाधान अन नसलेल्या बद्धल वाईट वाटून नं घेणं ह्यात अंतरंगी समाधान मानणे हेच महत्वाचं. तसेच शरीर जे मिळालं त्याचा कधीच गर्व नं करणं अन जे आहे आपल्याकडे त्याचाही गर्व नं करणं हेच सुखी समाधानी योग्य अन समृद्ध जीवन सूत्र असंच मी म्हणेल. आहे त्यात इतरांना देतं राहणं मदत करणं अन आपलं आयुष्य सार्थकी करतं राहणं. जगतं असताना पुण्य कर्म करतं राहणं. अन उर्वरित आयुष्य सुखात जगणं ह्या साठी कर्म पुण्य पदरात असणं खुप महत्वाचं.अन गेल्या नंन्तर जनमानसात आपण आठवणीत उरण्यासाठी जगतं असतांना माणसात राहतोय तर माणुस म्हणून जगतं राहणं हेच आयुष्य जगणं असंच मी म्हणेल. कुणालाही नं दुखवता कोणाला अपमानित नं करता आयुष्यात कोणी अपमानित होणार नाही बोलतांन...

संक्रात लेख ✍️

Image
  "संक्रात " सण उत्सव म्हणजे आनंद, सुख शांती कुटुंब घर परिसरातील सारी मानव जात यांचा सोहळा. मग तो आनंदाचा दिवस असेल, एखादा समारंभ असेल किंवा मग सण. भारतीय संस्कृतीत येणारा प्रत्येक सण, उत्सव हा आपल्या शरीरासोबतच मनाचे सुद्धा आरोग्य जपत असतो. भारत देश हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान असल्याने सर्व सण उत्सवांची रचना ही बदलत्या ऋतूप्रमाणे केली आहे. नव्हे तशीच अभ्यास केल्या अंती दिसते. मराठी वर्ष्यातील पहिला सण हा मकर संक्रात. मकर संक्रांती हा भारतातील एक प्रमुख सण असून तो निसर्ग, पीक, आणि परिवर्तनाचा उत्सव मानला जातो. दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जाणारा मकर संक्रांती हा सौर सण आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, त्याचं स्वागत या सणाने केलं जातं. मकर संक्रांती हा सण नवीन पीक, निसर्गाच्या चक्रात बदल, आणि मानवतेचा संदेश घेऊन येतो.असंच म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणून ओळखला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करतात.  दिवस आधी भोगी आणि ...

संक्रात क्र. 3 अभंग ✍️

 संक्रांत  गोड तीळ गुळ! आरोग्याचं मूळ! करते सदृढ! मनुष्याला!! वाटून वाढवे! प्रेमाचा गोडवा!  सर्वांचा मिळवा! आशीर्वाद!! संक्रांत सणाचा! मेळावा मनाचा! एकत्र खाण्याचा! कुटूंबात!! उत्सव आनंद! आल्हाद तो गधं! लावतोच छंद! गोडाईचा!! सूर्याचं भ्रमण! ते मार्गक्रमण! ये उत्तरायण! पृथ्वी साथ!! सृष्टी चक्र सारं! निसर्ग फेऱ्यात!  भरतो साऱ्यात! प्रेम बंध!! वर्णन करतो! प्रदीप अभंगी! संक्रांतात रंगी! आनंदात!!  प्रदीप मनोहर पाटील गणपूर तां. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055