सुरपाखरू क्र 1
सुरपाखरू अंडी, अळी, कोष नंन्तर येणारं सुंदर पाखरू त्याला गवसलेला सूर त्याला नाव दिलंय सूर गवसलेलं पाखरू. असंच माणुस मनुष्य जन्मात कधी आपला सूर हरवतो सूर कुठंच गवसंत नाही . अगदी कोषात गेलेल्या अवस्थे सारखं जीवन जगतं असतो. त्याला त्या कोषातील अवस्थे मधून बाहेर काढणं हि फार किचकट अन खुप अवघड त्रासदायक मन परिवर्तन करणारी प्रक्रिया आहे असं वाटतं. एखाद्या सुप्त अवस्थेत जीवन जगतं असलेला माणुस. त्याच्या मानसिक शारीरिक भावना जागृत करून जागृती आणत त्याला जीवन मार्ग दाखवतं उंच भरारी घेण्यासाठी तयार करणं खुप मोलाचे कार्य आहे असंच वाटतं. एकदा काय असा सुप्त कोषमय अवस्थेत गेल्या सारखं वागणाऱ्या मनुष्याला जागृत करणं. त्याच्या मनात असलेल्या क्षमता जागृत करणं त्याचं हृदयात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगात खुप माणसं प्रयत्न करतं असतात. जगात असं कोण नाही तो कधी ना कधी या सुप्त अवस्थेत गेला नाही असा. कोणत्या तरी वळणावर कधी वाटतं बस आता बस झालं आहे तितकं खुप आहे. मग त्या माणसाचं क्षेत्र कोणतंही असो. थांबून घेणं किंवा ईतर गोष्टीत मन रमवून घेणं आपलं मूळ विसरून जगणं असंच काहीतरी असतं तीच काही अंशी सूर...