Posts

Showing posts from February 8, 2026

भोळा शिव शंकर ✍️

Image
"शिव शंकर " देवांचा हा देव! भोळा तुझा भाव! घेतो मज ठाव! महादेव!! ॐ नमः शिवाय! भोळी माझी भक्ती!   उभी तुझी शक्ति! मज पाठी!! नित्य सेवा तुझी! करतोय राजी!  काळजी घे माझी!तुचं देवा!! जीवन देतोय! सर्व करतोय! तु चालवतोय! चक्र सारं!! कृपा तुझी झाली! उभारी तु दिली! शरीरात आली! धडधड!! शंकर पार्वती! एकरूप दोघं! आवळतो राग! नामघेत!! जळी स्थळी भासे! चोहीकडे दिसें! आस तुझी असे! भेटण्याची!! प्रदीप रोजचं! पुजन करतो! अभंग लिहतो! तुझ्या मुळे!! प्रदीप मनोहर पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

शंकर ✍️

Image
  "शंकर " कैलास पर्वत! शंकर पार्वती! स्वर्गचं धरती! देवाचेच!!  सर्वांचा तो देव! भोळा महादेव! सांगतात पाव! भक्त गण!! ॐ नमः शिवाय! मंत्र जाप करी! भक्त लिन सारी! देवाचीच!! देवता राक्षस! सारेच पूजता! सृष्टी कर्ता धर्ता! महादेव!! मंदिर सम्शान ! पाझरे पाषाण! नदी हो निर्माण! जटेतून!! निल कंठ धारी! दृष्ट तोच मारी! भक्त गण तारी! भोळा देव!! शक्ति मुक्ती रूप! भव्य ते स्वरूप! दाखवी प्रारूप! दिव्य शक्ति!! शिव शंभु जाणे! भक्त गुण सारे! वाहतात वारे! देवा मुळं!! देवाचं वर्णन! करतो प्रदीप! लावतो तो दिप! नित्य सेवा!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055

विज्ञान अभंग ✍️

Image
 "विज्ञान " नवीन कल्पना! कामात तत्पर! करतो सत्वर! काम सारे!! पारंपारिकाचे! रूपांतर नवं! आधुनिक हवं! विज्ञानात!! वापर तांत्रिक! असतं यांत्रिक! नसेचं मांत्रिक! संकल्पना!! शोध नवं नवे! जुनाट वस्तूचे! भंगारात साचे! नवं होण्या!! जल स्थल वायु! वाढवते आयु! बळकट स्नायू! औषधानं!! यंत्रणा राबवे! हत्यार चालवे! वाहन पळवे! यंत्र सारे!! अंनत सुविधा! नसते दुविधा! काढता निविदा! ऊंधोगात!! काम केलं कमी! जगण्याची हमी! शंक्कल ती नामी! संशोधन!! प्रदीप सांगतो! विज्ञानाची कथा! टेकवत माथा! शास्रज्ञास!!©️®️ प्रदीप पाटील  गणपूर ता. चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

संस्कार अन संस्कृती बदलाच्या मार्गांवर.

Image
 संस्कार अन संस्कृती बदलाच्या मार्गांवर. पूर्वी कुटुंब व्यवस्था खूप मोठी होती. घरं होती त्यात घरपण होतं. कारभारी कारभारीण जसं सांगेल तसं एकत्रित कुटुंब पद्धतीत चालतं असे. अंत्यत सुयोग्य उत्तम घरात सर्व संमत काटकसरीत काटेकोर लहान थोर सन्मान आदरणीय आदर भाव जोपासत सर्व चालतं असे. अंगणी तुळशी घरात देवघर देव्हारा सडा रांगोळी सुसंस्कृत असं घर घरपण ग्रामीण भागात होतं. गाव खेड्यात गावकी भावकी जातीपाती होत्या जातीभेद नव्हते. धर्म होते पण धर्मभेद नव्हते असा सुस्थितीत चोख कारभार सर्वीकडे दिसें. दुसऱ्याचं सोनं पडलेलं राहील त्याला कोणी हात लावत नसे असा. उत्तम संस्कार पूर्वी होता जे असेल ते स्वतःचं असेल तेच माझं. सुख होतं समाधान होतं. आहे त्यात मान होता सन्मान होता. गरीब असो वा श्रीमंत दरी दिसतं नव्हती सारे समानतेत आपल्या आपल्या पायरीनं वागत असतं. वडीलधर्यांचा सन्मान करतं असतं. मग तो आपला असो वा परका. जातीचा असो वा नसो. मोठयाला मोठं म्हणतं वडीलधारी यांचा आदर करतं.ही विविधता होती पण विवीधतेत एकता होती. इंग्रज आले अन आधुनिक वारे वाहू लागलेत. तेथेच संस्कृती बद्धलाचे वारे वाहू लागलेत. देशात पाशात्य...

वैभवशाली मराठी भाषेला क्षीण करणारे दगाबाज कोण.

Image
 वैभवशाली मराठी भाषेला   क्षीण करणारे दगाबाज कोण.  क्षीण होऊ पाहतेय आज मराठी भाषा. महाराष्ट्र आणि जगात हळूहळू मराठी जनता पसरली त्या सोबत मराठी सुद्धा जगात सर्वदूर जाऊन पोहचली असं वाटतं असतांना मनात विचार आला तसं पाहिलं तर मराठी लोकं पोहचलीत सर्वदूर पण मराठी कमी पोहचली त्या मानाने असंच वाटतं. मराठी माणसांच्या मुलखात दुसऱ्या प्रांत देशातील लोकं आलीत तर मराठी बोलणं विसरून मराठी लोकं समोरच्याची भाषा बोलु लागतात. हाच मोठा दोष आहे मराठी माणसाचाचा समोरचा माणुस पर प्रांतातून,परदेशातून येऊन सुद्धा आपली भाषा सोडतं नाही बोलतांना तीच भाषा बोलणं पसंत करतो. तर इथला माणुस स्व भाषा सोडुन दुसऱ्यांची बोली बोलु लागतो त्यातून स्वतःचं हसं करून घेतं असतो.तरी इतरांची बोली बोलु लागतो त्याला समजावी म्हणून. मोठा दोष आहे मराठी माणसातील असं वाटतं असो. जग बदलतंय पृथ्वीवर अंनत बोली अस्तित्वात आहेत. पण तरी जगातील हुशार जनता आपलं स्वतःचं हक्काचं असं काहीच सोडतं नाही. पण मराठी माणुस स्वतःला विसरून जगाला अर्पण करायच्या भानगडीत स्वतःला विसरतो. आपली असलेली बोली जात धर्म सुद्धा बाहेर गेला तर मराठी माणुस...

गणपूर ✍️

Image
 गणपूर   माझे गणपूर! सुंदर दिसतं! संस्कारी भासतं! वागण्यात!! सुख दुःख येता!सदैव सोबती! मदतीला येती! गावकरी!! मध्यभागी दिसें! मंदिर मारोती! सर्वांचिचं नीती! देवभोळी!! प्रात पूजा होती! करतात शेती! जपतात नाती! सारे जण!! भवानी देवता! रक्षण करती! काठा वरती! गावदेवी!!  नदीचा प्रवाह! वेगात असतो! सर्वांना दिसतो! वाहतांना!! गाव काठावर!अनेर वाहते!  वरून पाहते! गावदेवी!! रक्षण करते! संकट समई! सर्वांचीचं आई! माँ भवानी!! प्रदीप सांगतो ! स्वप्नात आलीय! सांगून गेलीय! मीच देवी!! प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055