Posts

Showing posts from September 13, 2026

पत्रकारांना किंवा साहित्यिकांना गाव गाडा किंवा सहकारी संस्था चालवण्या संधी दया.

Image
पत्रकारांना किंवा साहित्यिकांना  गाव गाडा किंवा सहकारी संस्था चालवण्या संधी दया. प्रदीप पाटील. गणपूर  आज पर्यंत  बघतोय सरकार ज्या काही सहकारी संस्था किंवा ग्रामचायत सारख्या संस्था कार्यकाळ मुदत संपल्यावर प्रशासक नेमणूक करते. प्रशासकीय अधिकारी हा त्या त्या संस्थेत असतोच सरकार त्यांच्याचं कडे कारभार सोपवत असते. हे अत्यन्त चुकीचं असुन त्यांच्यावर अंकुश कोणाचाच राहतं नाही एकटा एकट्यानं  सर्व कारभार बघणं सरकारच्या मर्जीने असंच झालं. काही प्रशासक हे मनमर्जीने कारभार करतात असं बहुतेक ठिकाणी गावोगावी निदर्शनास येते. मग ती ग्रामपंचायत असो वा विविध कार्यकारी, दुध संस्था इ. अनेक सहकारी संस्था.जो अधीकारी ग्रामसेवक किंवा सेक्रेटरी यांच्याच कडे मुदत संपल्यावर पदभार दिला जातो हेच मुळात चुक आहे. ग्रामसेवक सरकारी पद आहे त्याला अंकुश किंवा देखरेख हा सरपंच करतो. सरपंच ची जागा ग्रामसेवक एकटा कसा घेऊ शकतो. त्याच्यावर देखरेख हि सरपंच पद खालसा किंवा मुदत बाह्य झाली असेल तर त्या ठिकाणी ग्रामसेवक सोबत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार साहित्यिक जे गावातीलच असतात. त्यांना गावाची माहिती असते ...