सूर्य गवसला
विषय :- "आणि सूर्य गवसला"
शीर्षक -:- "सूर्य गवसला"
कविता -:- सूर्य गवसला…
दीन दुःखी समाज
होता साहुकारांना माज
जनतेला पिळून चाले
श्रीमंत फिरंग्यांचं राज.
कष्टकरी होता दुःखी
जन्मले गरिबीत राव
शिकून दिली घटना
झालेत लाडके भीमराव.
माणसात संत अवतार
प्रकाश पडला फार
केला मनुवर वार
आला जगण्यात सार.
चुणूक बालपणीच दिसली
जाऊन दूरदेशी शिकले
तज्ञ बनून आले
समाजास जागृत केले.
सूर्य गवसला भारतास
संविधान देशास मिळाले
चमक अंधारात पडली
दैदिप्यमान राष्ट्र निर्मिले.
✍🏻 प्रदीप पाटील
गणपूर ता - चोपडा.
जिल्हा - जळगाव. ©️®️
गणपूर ता - चोपडा.
जिल्हा - जळगाव. ©️®️
🌹➖➖➖🔸🙏🔸➖➖➖🌹


शतश: नमन...!
ReplyDeleteआदरणीय प्रदीप पाटिल , खूप छान कविता। संविधान निर्माता वर ,आपण अगदी प्रासंगिक विवेचन केला आहे। मनःपूर्वक बधाई।
ReplyDelete