सध्याचं राजकारण 🪑✍️
सध्याचं राजकारण
जनतेला मारणं हेच
आजच्या राजकारण्यांचं धोरण
लोकांचं होतं मरण
यांच्या घराला तोरण.
एकजात बनलीय सारी
तिजोरी नेता घरी
जींकण्या साठी वापरताय
उपाय सारा अघोरीं.
जाहिरातीनचा करता गाजावाजा
जनतेच्या पैश्यातून मजा
लोकांना मिळते सजा
भटकतो देशाचा राजा.
फोडा, तोडा झोडा
नीती सारी गोऱ्यांची
त्याहून दृष्ट बुद्धी
लोकं म्हणतात काळ्यांची.
देखावा विकासाचा भारी
लुटालूट सुरू सारी
लालूच दाखवत जनतेला
पैसा सारा राजदरबारी.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव पिन. 425108
मोबाईल 9922239055
.jpeg)
Comments
Post a Comment