वृद्धाश्रम
नको दाऊ पोरा
जरी थकलंय शरीर
नको देऊस खीर
फक्त असूदे शीर.
लाभेल पुण्य तुला
नको बांधूस झुला
ओसरीत दे आसरा
नको वृद्धाश्रम मुला.
मिळेल मान तुला
आजारपणात कर देखरेख
हिच कुटुंब मेख
तुला म्हणतील शेख.
सांगतो तुलाच मुला
फेड पांग माझे
सांगेल मी नातवाला
फेडेल उपकार तुझे.
करावं तसं मिळेल
तुला तेव्हा कळेल
हिच संपत्ती उरेल
कीर्ती आपलीच पसरेल.©️®️
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव पिन 425108
मोबाईल. 9922239055
.jpeg)
Comments
Post a Comment