फादर्स डे ✍️
!!फादर्स डे!!
सृष्टी दाखवली ज्यानं
त्याचा हो आलाय दिन
वाटतंय कसतरी
दिवसात हो कोंडून.
ठेव असते मनात
वारसा तो जीवनात
राबे बाप हो रानात
सोबत साथ हृदयात.
मुला साठी तेच झटे
आता निघाली दिवटे
वागता ह मुलं खोटे
संपत्ती त्याचीचं लुटे.
रुद्धाश्रम ठेवतात
नाव त्यांच लावतात
बालपण विसरता
अश्रू खोटं गाळतात.
गावातील ते वडील
साठवा मनात रूप
रोज पहा त्यांचं मुख
वाटत देव स्वरूप.
सदैव करा संन्मान
ठेवा त्यांचा अभिमान
सुखी करा नित्य मन
डे रोजचं करा छान.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055

Comments
Post a Comment