संक्रात लेख ✍️
"संक्रात "
सण उत्सव म्हणजे आनंद, सुख शांती कुटुंब घर परिसरातील सारी मानव जात यांचा सोहळा. मग तो आनंदाचा दिवस असेल, एखादा समारंभ असेल किंवा मग सण. भारतीय संस्कृतीत येणारा प्रत्येक सण, उत्सव हा आपल्या शरीरासोबतच मनाचे सुद्धा आरोग्य जपत असतो. भारत देश हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान असल्याने सर्व सण उत्सवांची रचना ही बदलत्या ऋतूप्रमाणे केली आहे. नव्हे तशीच अभ्यास केल्या अंती दिसते. मराठी वर्ष्यातील पहिला सण हा मकर संक्रात. मकर संक्रांती हा भारतातील एक प्रमुख सण असून तो निसर्ग, पीक, आणि परिवर्तनाचा उत्सव मानला जातो. दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जाणारा मकर संक्रांती हा सौर सण आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, त्याचं स्वागत या सणाने केलं जातं. मकर संक्रांती हा सण नवीन पीक, निसर्गाच्या चक्रात बदल, आणि मानवतेचा संदेश घेऊन येतो.असंच म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणून ओळखला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करतात. दिवस आधी भोगी आणि एक दिवस नंतर किंक्रांत साजरी केली जाते. सूर्य हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी साजरा होणारा एक महत्त्वाचा सण. या दिवशी तिळगुळ वाटून 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणून नात्यातील कटुता विसरून नवीन सुरुवात केली जाते. हा सण उत्तरायण सुरू झाल्याचे प्रतीक असून, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे आणि काळे कपडे घालणे (उष्णता शोषण्यासाठी) यांसारख्या परंपरा पाळल्या जातात, विविध खेळ आपल्या आपल्या प्रांत गणिक लहान मोठी मंडळी खेळ खेळत हसत खेळत साजरा करतात. नात्यात कधीही कटुता येऊ नये किंवा आली असेल तर ती कटुता या सणा पासून विसरून जातं आनंद प्रेम जीवनात यावा म्हणून साजरा होणारा उत्सव. त्याचं प्रमाणे या.पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या जवळ येऊ लागतो. पृथ्वी अन सौर मालेतील ग्रह आपला मार्गक्रमण करतं असतात. पृथ्वी च्या अधिक जवळ येण्या सुरवात काळ आज पासून सुरु होतो. भ्रम्हांड मधील सदैव अविरत सुरु राहणारी ही प्रक्रिया. त्यातून सकाळ, दुपार, संध्याकाळ, ऊन, सावली, रात्र, दिवस, साल, महिना, वर्ष, सौर माळेतीत ग्रह फिरण्याच्या स्थिती वरून सारं सारं चक्र सुरु असतं. त्यावरच निसर्ग चक्र सुद्धा अवलंबुन असतं. निसर्ग चक्रात पावसाळा सम्पुन हिवाळा सुरु झालेला असतो. हिवाळ्यातील पिकं रान हिरवाई नं नटलेलं असतं. जमिनीत असलेलं ओलं ओलाव्यात पिकं जन्माला आलेली असतात. त्या पिकांना अन मानवाला सृष्टी मधील साऱ्या प्राणिमात्र यांना सूचना देण्याचा दिवस म्हणजे हा. सूर्य पृथ्वी च्या जवळ येण्याची सुरवात आज पासून झालीय. वर्ष भराची संक्रमण अवस्था त्या अवस्थेचा पहिला दिवस. आता हिवाळा हळूहळू लवकर संपेल अन उन्हाळ्या कडं आता वाटचालीस सुरवात होईल हाच संदेश या दिवशीचा असंच माझं मत. हिवाळ्याचा या शेवटचा उत्सव होळी येण्याकडं वाटचालीस सुरवात होळी आली की पूर्ण हिवाळा सम्पुन उन्हाळा सुरवातीचा पहिला दिवस होळी असं मी मानतो. त्या दिवसा कडं वाटचालीस सुरवात. तीळ गुळ हिवाळ्यात अंगात तेलकट पणा असावा उष्णता टिकून राहावी. प्रोटीन युक्त अंग सदृढ राहावं म्हणून तीळ गुळ खाद्य पदार्थ. खाऊन तन्दुरुस्त राहावं. अंगात साठवणूक करून ठेवली की उन्हाळा चाहूल लागली आता. तर उन्हाळ्यात सूर्य किरणं अंग भाजतील म्हणून अंग आतून सक्षम राहावं म्हणून असं खावं असंच मला वाटतं. सृष्टी मधील पिकं हिरवी झालीय त्याचं कोवळ्या पिकांच्या पानं, फुलं, कणसं, हुरडा, भाजून खाण्यास सुरवात होण्याचा पण हा काळ असंच वाटतं. पुढे असं कोवळे ऊन सावली खेळ आणि कोवळ्या पिकांच्या पानं फुलांचा कणसांचा आस्वाद पुढे उन्हाळा सुरु होई पर्यंत चा हा काळ. सुरवात आज पासून गोडधोड बनवतं हसत, खेळत आनंद मनात शरीरात भरतं. सण उत्साहात साजरा करतं. सुरवात पर्व. या सह संक्रांत हि या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर राक्षसाचा वध करून लोकांना मुक्त केले, अशी कथा आहे. यामुळे हा दिवस साजरा केला जातो. सण हा संक्रांत देवीच्या रूपात साजरा केला जातो. अध्यात्मिक भावना त्यात आहे. इतिहास, भूगोल, त्यात खगोल अभ्यास करतं. सृष्टी हि माता आहे. सृष्टी माता म्हणजे संक्रात विविध अंग अन रंग घेऊन पृथ्वी वर अवतार म्हणजे संक्रांत. पंचांग निसर्ग सौर चक्र यात सृष्टी माता रूप म्हणजे संक्रात असंच प्रदीपचं सांगणं. जीव निर्माण करतं जीवांना खायला देणारी सुख, दुःख ऊन, थंड,गरम, पाऊस पिकं पाणी याचं दर्शन देणारी माता सारं येणारं भविष्य वर्तवणारी माता ती संक्रात.
सृष्टी चक्रात सौर मालेत सूर्य हा महत्वाचा ग्रह. या ग्रहच्या चालीवरून सारं चक्र सुरु असतं. त्याची चाल आज पहिल्या फिरतांनाच्या संक्रमन अवस्थेत दिवस. या दिवशी पृथ्वी वरील जीव जीवन सृष्टी निर्मिती सृष्टी माता सारं सांगते. सृष्टी मातेचे अनेक रूप त्यातील एक जीव रूप संक्रात. त्या मातेचं पूजन संक्रात रूपात करतं. हा सण साजरा करतात असंच मी म्हणतो. तसेच मानव जीव जीवन प्रणालीत आपापसातील वाद विसरून, प्रेम आणि सौहार्द वाढवण्यासाठी हा साजरा करतात धर्म अन निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असंच वाटतं. संक्रात देवी ने धार्मिक कथेत किक्रासूर राक्षस मारला म्हणून क्रिक्रांत दुसऱ्या दिवशी साजरा करतात. असो धार्मिक तेत विविध अंग देऊन सण साजरा करण्याची पारंपरिक रूढी परम्परा वर नमूद केल्या प्रमाणे. निसर्गचक्र, सौरचक्र, भ्रम्हांड भ्रमण, जीव जीवन, ऋतुचक्र, याचा अभ्यास करून वार, तिथी, पंचांग म्हणजे हेच चक्रावर कथन. या नुसार संक्रात, होळी, दिवाळी, पाडवा सृष्टी तील विविध साऱ्या चक्राच्या मार्गक्रमण नुसार धार्मिक अध्यात्मिक अंगातून विविध देव, देवी, देवता, ह्या म्हणजे निसर्ग चक्रातील फिरवणाऱ्या सांगणाऱ्या ग्रह, तारे जीव सृष्टी ह्याच सारी पंचतत्व घटक साऱ्या पशु पक्षी प्राणी मात्रा सह सारी सृष्टी माता म्हणजे विविध सणाला विविध रूप घेऊन येणारा उत्सव. प्रत्येक सण याला विविध अंग अन निसर्ग चक्र सह विविध भ्रम्हांड मालेतील सारं दर्शवणारं काहीतरी असतं प्रत्येक सणाला. असंच माझं ठाम मत आहे. आज सृष्टी माता पूजन संक्रांत म्हणून करूयात आणि निसर्ग आणि सौर चक्र काय सांगतं ते पंचांग सांगणारी सृष्टी माता संक्रात साजरी करूयात.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922238055


Very nice
ReplyDelete