जीव जीवनात वृत्ती प्रवृत्ती ✍️



 "जीव जीवनात  वृत्ती प्रवृत्ती. "


जन्म झाला माणुस म्हणून. जीवन जगण्याचं सत्य अनुभवतो. जगतं असतांना अनेक अनुभव येतं असतात. सुख दुःखाच्या हेलकाव्यात मार्गक्रमन करतं असतो. या जन्मात सर्वाथाने लाभ घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ते करतांना तो स्व हित बघत असतो. हित बघता बघता स्वार्थी कधी होतो समजतं नाही. स्वार्थी कितीही असला तरी त्याला प्रत्येकाला वाटतं आपण तर स्वार्थ कधीच करतं नाही हवं तेवढंच बघतो. हवं तेवढंच बघतो घेतो म्हणजे काय? मनुष्य जन्मात हवं ते संपत नाही हाव वाढतच जाते. सकाळी नास्ता केला आता बस दुपारीच जेवणार मला दुसरं काही नको. संध्याकाळी थोडं हवं रात्री बस इतकंच. राहायला घर फिरायला गाडी हवी खिश्यात थोडा पैसा हवा. बॅंकेत थोडे हवेत घरात साऱ्या सुविधा हव्यात बस इतकंच बाकी काही नको. कुठं जाणे फिरणं थोडी मौज मजा हवी बाकी काही नको. इतरांच्या पेक्षा जास्त हवं बस दुसरं काही नको. यालाच तर स्वार्थ स्वहीत म्हणतात. हित जोपसण्या सारी धडपड सदैव सुरूच असते. मानवी मन हे असंच असतं. मानवात सर्व पशु, पक्षी, किडे, मुंगी, जगातील सारे सारे जीव लहान मोठे प्राणी. यांच्या वृत्ती प्रवृत्ती कळतं नकळतं साऱ्या साऱ्या प्रवृत्ती मानव प्राण्यात उतरल्यात असं वाटतं. प्रत्येक मानवात कोणत्या ना कोणत्या जीवांची वृत्ती प्रवृत्ती उतरलेली दिसते असं मला वाटतं. कोण कुत्रं, मांजर, गाय, बैल, वाघ, सिहं, हत्ती,घोडा, उंदीर, घार, ससा, कासव, चिमणी, पोपट,कावळा, घूस, सर्प, मुंगुस, या जगातील नव्हे जीव सृष्टी मधील सर्व सर्व प्राणी त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती कोणत्या ना कोणत्या प्राण्या सारखी भासते दिसते. आपल्या पौराणिक ग्रन्थ यात असं म्हटलंय की 84 लक्ष योनी फिरून मनुष्य योनीत जन्म मिळतो. म्हणजेच जगातील जीव यांच्या एक एक करतं साखळीतून शेवटी हा मनुष्य जन्म मिळाला असं सांगितलं लिहलं आहे. म्हणून का या सर्व विविध प्राण्यातील वृत्ती प्रवृत्ती सर्व माणसात उतरल्यात. कोण सरड्या सारखं रंग बदलतो, सर्प सारखं विषाचा चावा घेतं, वाघ सारखं राबवतं किंवा मारून खातं, सिहं सारखं वागतं,कुत्र्या सारखं दुसऱ्याची गती सहन होतं नाही किंवा इमानदारी नं वागतात, घुबड सारखं निशाचर, अश्याच कोणत्या ना कोणत्या प्राण्या सारखं वृत्ती नं वागणं.जीव सृष्टी मधील साऱ्या जीवांच्या पशु,पक्षी साऱ्या साऱ्या जीवांच्या वृत्ती, प्रवृत्ती, मानवात उतरल्यात. फक्त फरक आहे. कोण कोणत्या वृत्ती प्रवृत्ती नं वागतं बस इतकंच. असो "जीव सृष्टी " या आगामी पुस्तकात या साऱ्या गोष्टी लिहणार आहे जर देवानं लिहू दिलं तर हं. म्हणून  लेख लिहताना थोडक्यात थांबतो.  ©️®️ 


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे