सुरपाखरू क्र 1




 सुरपाखरू 


अंडी, अळी, कोष नंन्तर येणारं सुंदर पाखरू त्याला गवसलेला सूर त्याला नाव दिलंय सूर गवसलेलं पाखरू. असंच माणुस मनुष्य जन्मात कधी आपला सूर हरवतो सूर कुठंच गवसंत नाही . अगदी कोषात गेलेल्या अवस्थे सारखं जीवन जगतं असतो. त्याला त्या कोषातील अवस्थे मधून बाहेर काढणं हि फार किचकट अन खुप अवघड त्रासदायक मन परिवर्तन करणारी प्रक्रिया आहे असं वाटतं. एखाद्या सुप्त अवस्थेत जीवन जगतं असलेला माणुस. त्याच्या मानसिक शारीरिक भावना जागृत करून जागृती आणत त्याला जीवन मार्ग दाखवतं उंच भरारी घेण्यासाठी तयार करणं खुप मोलाचे कार्य आहे असंच वाटतं. एकदा काय असा सुप्त कोषमय अवस्थेत गेल्या सारखं वागणाऱ्या मनुष्याला जागृत करणं. त्याच्या मनात असलेल्या क्षमता जागृत करणं त्याचं हृदयात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगात खुप माणसं प्रयत्न करतं असतात. जगात असं कोण नाही तो कधी ना कधी या सुप्त अवस्थेत गेला नाही असा. कोणत्या तरी वळणावर कधी वाटतं बस आता बस झालं आहे तितकं खुप आहे. मग त्या माणसाचं क्षेत्र कोणतंही असो. थांबून घेणं किंवा ईतर गोष्टीत मन रमवून घेणं आपलं मूळ विसरून जगणं असंच काहीतरी असतं तीच काही अंशी सूर नसलेली आपलं उद्धीष्ट पूर्ण नं करता किंवा आहे त्यात समाधान मानत जगणं त्याला मी म्हणतोय कोषातील सुप्त अवस्था. त्या अवस्थेतून बाहेर पडण्या साठी सुद्धा आपल्या आजूबाजूला असणारी सारी लोकं कळतं नकळत प्रयत्न करतं असतात. बोलून मार्गदर्शन करून स्तुती किंवा तूच्छ लेखून सुद्धा मन परिवर्तन होतं. तूच्छा सारखं वागणूक कोणी दिली तर त्यातून मन जागृत होऊन करून दाखवतो असं मनात येतं. असं काहीतरी सांगुन दाखवून त्याच्यातील गुणांना चालना देतं असतात.निरंतर चालणारी जग्राहाटीत प्रक्रिया आहे. कळतं नकळतं बोलणं एकाच दुसऱ्याला लागतं अन माणुस जागृत होतो असंच असतं. आज थांबलं पण उदया कोणत्यातरी गोष्टीन मन करायचंच असं म्हणतं करतं असतं, धावत असतं माणुस. आपलं उद्धीष्ट साध्य करण्या पळतं असतो. सूर कधी हरवतो पण रात्र संपली की सकाळी पळतं असतो.तोच सूर गवसलेलं पाखरू सारखं उंच उडण्या साठी तयार असणं. दिवस रात्री च्या चक्रा सारखं कधी थकलो तर थांबणं अन दिवस उजाडला उडणार तो ते. जगात सूर हरवलेली अंनत आहेत. अन असं नकळतं सूर जागृत करून देणारी पण खुप आहेत. मी उदा. म्हणून सांगतो लिहण्याच्या ओघात. मी अन माझा लिहणं म्हणून काडीचाहि संबंध नव्हता.माझं अन लिखाण हा दूरावी्ये सम्बन्ध नव्हता. पण आज महाराष्ट्रात अन काही अंशी महाराष्ट्र बाहेर मराठी बोलणं लिहणं वाचन करणाऱ्यात नाव जाऊन पोहचलंय असं वाटतं. महाराष्ट्रातील जवळ जवळ शंभर वर वर्तमानपत्रात माझं लिखाण छापून आलंय येतं असतं. खुप दिवाळी अंकात लेख अन कथा आल्यात आजवर जो नावलौकिक झालाय. तो कश्यामुळे झाला ते आज सांगतो. मी सुमारे पंद्रा वीस वर्ष्यापूर्वी नवा मोबाईल घेतला. वॉट्सअप ऍप आलं त्यात एक चारोळी लिहण्याचा ग्रुप मध्ये मी अनअवधानाने जोडला गेलो. तेथे लोकं चारोळ्या लिहून पाठ्वत असतं मला त्यातला काहीच गधं नव्हता. चोरोळी, कविता, लेख, कथा काय मला समजतं पण नव्हतं. व्याकरण यमक,गमक माहित पण नव्हतं पण तेथे त्यांचं लिखाण वाचुन ग्रुपवर दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी मी पण एक दोन तीन ओळी लिहून टाकल्या. त्या ओळी वाचुन तेथील लोकं माझ्या लिखाणाला हसायला लागलीत. मला लक्षात आलं नाही का हसताय. एकाला विचारलं का हसताय तर त्यांनी सांगितलं चुकीचं हसु येईल असं तु लिहलं. मला राग आला त्या गोष्टीचा मी लगेच ग्रुप सोडला बाहेर पडलो. अन तेथेच ठरवलं. आपण चारोळी कशी असते लिहायची,शिकायची, कविता लिहायची आणि हसणाऱ्याच्या पेक्षा मोठं नाव कमवायचं. एक दिवस ते माझा हेवा करतील असं करून दाखवायचं . असंच विचारतं विचारतं आजपर्यंत येथवर येऊन पोहचलो. हजारवर कविता लिहल्या असतील. खुप लेख लिहलेत. कथा थोड्याच पाच- सात पण खुप ठिकाणी छापून प्रसिद्ध झाल्यात.रेडीओ पांझरा वर लेख, कविता, कथा वाचन झालंय होतं असतं. रेडीओ पुणेरी आवाज च्या चारोळी आठोळी साठी अनेकदा चारोळ्या पाठ्वल्यात. अनेक पुरस्कार मिळालेत. शब्ददिप ब्लॉग, शब्ददिप पेज वर सतत लिखाण होतं असतं. शब्ददिप प्रकाशन काढलंय स्वतः कवी, लेखक अन स्वतःचं पुस्तकं, लेख, कथा, कविता संग्रह, प्रकाशन प्रकाशित करण्याचा मानस. असंच खुप लिहण्या सारखं आहे. मला सूर पाखरू सारखा सूर हा कुणाच्या हिणवण्या मुळं गवसला. मला हिणवणारे माझे गुरूच आहेत. त्यांच्या मुळेच मला उंच उडण्याची भरारी घेण्याची लिहण्याची धुंद धुंदी चढली. जगत असतांना मला माहित नव्हते माझ्यातील गुण. त्या गुणांनां कोषातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाला. मन पाखरू उडतं झालं. सुप्त अवस्था सम्पुन नवं उंच भरारी घेण्याची अवस्था जागृत झाली. मन जागृत होण्याच्या सूर गवसण्याच्या अवस्थेला सुरपाखरू मी म्हटलं. ©️®️ 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055




Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे