दसरा ✍️

 दसरा 


गाव सीमा पार ! शमी वृक्ष पूजा!

शस्र सारी पाजा! रक्षे साठी!!


करतं उलंघन! साऱ्याच तत्वाचं!

जागृत सत्वाचं! अवलंब!!


वचक असावा! धाक व्हावा चोरा!

संदेशचं सारा! दसऱ्याला!!


नवं वस्र घाली! शिवार ओलांडी

धान्य सारं धुंडी! जगण्याला!!


आपट्याची पाने! जिंकतात मने!

हृदय ते जाणे! स्वकी्यांचं!!


सण मोठा सारा! एकतेत करा!

सुगीचा पसारा! धन धान्य!!


पीक पाणी धान ! देवाण घेवाण!

संदेश हो छान! दसऱ्याला!!


गाठी भेटी घेत! सुखात दुःखात! 

करा सुरवात! साथ देत!!


 कणसं भरली! माणसं तरली!

एकीत उरली! भाऊबंद!!


कुबेराचं धन! प्रदीपचं मन!

नव्याने निर्माण! लिहूनच!!


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे