हे प्रेम वेड्याचे ✍️

 हे प्रेम वेड्याचे 


हे प्रेम वेड्याचे कळलेचं तुला नाही 

का फुल गुलाबाचे कधी हसले नाही 


ओठावर तुझ्या माझंच नाव होतं 

तरी सूर मनाचे जुळलेच नाही 


हृदयात माझ्या तुझंच नाव होतं कोरलं 

तरी घातलं दुसऱ्याच्या नावाचं डोरलं 


आठवणीत सतत येत शून्यात बुडवते 

तरी म्हणतेस मी का त्रास देते 


मुध्दाम नजरेत वार करतं राहतेस

घाव सदैव देत जखम खोल करतेस


स्वतः खुश राहतं शरीर सांभाळतेस 

 पाहुन मजकडे तु का सुखावतेस 


सांग तुला का कळलेच नाही

झुरवण्यात तुला वाटतं का नाही



प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे