अहो सांगा ना. लावणी क्र 6✍️
अहो सांगा ना
लावणी क्र. 6
अहो सांगा ना, कशी माझी रंगली
तुमच्या साठी कोरली,आज बघा ना सजली.
अहो सांगा ना, कशी रंगली मेहंदी
खाली लाल पट्टा, जसा दिसतो दुपट्टा
नक्षी जरा कोरली, मन त्यात माझं भरलं
धन तुमचंच आहे, पाऊल माझं भरलं.
1
मेहंदी तुमच्या नावाची, नक्षी कशी कोरली
वर मोत्याची माळ, पैंजनावर हो गुंफली
नजर हटवा जरा, नजरेच्या बाणाने तुमच्या
अलगद फिरवा नजर, नाहीतर गळतील मोती.
2
मोती मी सांभाळतेय, तुमच्या साठीच आजपर्यंत
छम छम करताय पैंजण सारीच चालताना
जपुन पडतंय पाऊल, राखलं तुमच्या साठी
अलगत ठेवा नजर, मोती सांभाळा ना.
3
झाली आता मोठी, पडतंय हळुवार पाऊल
पैंजण आवाज गुंजण, मनात साऱ्यांचं भरतंय
ह्या मोत्याच्या माळेवर, नजरा बघा खिळल्या
सांभाळतेय तुमच्या साठी, गाठी आपल्या जुळल्या.©️®️
4
प्रदिप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment