शेवटचा निरोप ✍️

!!शेवटचा निरोप!!


आता दया निरोप ! शरीराचं खोप!

होतं गोड रोप! सुकलंच!!


हसत खेळतं! बोलतं चालतं!

शरीर हालतं! असायचं!!


छान दिसायचं ! रामाचं स्वरूप!

वाटे  देवरुप ! माणसात!!


शरीराची साथ ! कर्तव्याची वात!

कष्ट जीवनात!जगतांना!!


केलं जमवलं! येथेच राहिलं!

नात्यात पाहिलं! सर्वा साठी!!


आलो होतो तसं! जातांना तसंच!

मधला भासच! जीवनात!!


शरीराच्या  कथा ! सांगितल्या व्यथा!

प्रदिप चा माथा! अभांगत!!©️®️


प्रदिप पाटील 

गणपूर . जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे