दिप अमावस्या ✍️
!!दिप अमावस्या!!
दिप अमावस्या नंन्तर आपल्या कडे आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे ती ) अमावस्या म्हणतात."गटारी नव्हे गताहारी"
भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान असलेले आहेत. तसेच स्धल काल व परिस्थिती यांच्याशी त्यांचा प्रगाढ संबंध आहे. आषाढ हा पूर्वी विशेष करुन तीव्र वर्षावाचा कालावधी असे.
अती पाऊस पडतं असल्यामुळे सर्वत्र घाण, चिखल, किडे,कीड, साम्राज्य मातंत असतं रुजत असतं. अती पावसामुळे अंधारलेपण व अन्न अनुपलब्धता हा मोठा अडचणीचा भाग असे.पूर्वी अन्नधान्य कमी प्रमाणात पिकत असे.म्हणून श्रावण सुरू होण्यापूर्वी व नंतरही श्रावणात कित्येकदा ऊपोषणाची स्थिती असे. शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता टाळण्यासाठी ऊपोषणाचा वैद्यकीय सल्ला धार्मिक आधार देऊन चार महिन्या साठी लागू केला गेला असावा. (चातुर्मास)
या दिवशी दीप पुजन करतात
येत्या गरुवारी दिनांक 24/जुलै रोजी दीप अमावस्या आहे. वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. पण दीप पूजे ऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते. महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया:
ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळेचं या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. तसेच या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. अन्न शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो. वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. आज आपण बघतो विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो. अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो. या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतचं. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत. शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात. तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते. विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो. म्हणून या दिवसात मांसाहार टाळावा आणि शाकाहार करावा. असंच शास्र आणि उत्तम आरोग्य साठीच अध्यात्मिक जोड देत केलेली सोय. म्हणून" श्रावण जरूर पाळा " आणि दिप अमावस्या महत्व जाणुन घ्या. कीर्द अंधाऱ्या रात्री येणार म्हणून आपल्या घरातील दिप पुजन देव्हाऱ्यात नक्कीच करा. विदयुत रोषणाई आली तरी लावलेले दिवे स्वच्छ केलेत तरी प्रकाश स्वच्छ पडतो. अध्यात्म आणि जीव रक्षण सुरक्षा अशीच सांगड घातलेली दिसते. आपणा सर्वांना येणाऱ्या शुभ श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा. ॐ नमः शिवाय. ©️®️
प्रदिप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा.जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment