नाचतोय मोर ✍️
!!नाचतोय मोर!!
थुई थुई नाचतोय मोर
मन झालं रानात चितचोर
काहूर करतं अंतरंगात घनघोर
बघून सुंदर मोरनी समोर
पिसारा केलाय वर अबोल सारं
मन भरताय जीव सुगन्ध रानभर
दिवस आला बहरण्याचा आज
रानात चढला फुलण्याचा साज
सूर्य सोनेरी किरण करतंय मन भरण
झाडांनी बांधली तोरण दोघचं हरण
सांज खुलली सजलीय धरा
मोहक वाटतोय सुंदर हा नजारा
प्रेम बंधन मनात स्पन्दन
निसर्गाचे सारं हे रणकंदन.©️®️
प्रदिप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment