गजरा माझा तुमच्या साठी क्र.3✍️
गजरा माझा तुमच्या साठी.
लावणी माझी क्र. 3
राया तुमच्या नावाचा बांधला गजरा राया
माझ्या रूपाचा आज तुम्ही हो आस्वाद घेणार का राया सांगा घेणार हो राया.
तुमच्या नावानं लावलाय कपाळी कुंकू
आज सुटलाय सुगधं गजर्याचा राया सुगन्ध थोडा घेणार का घेणार का
आज माझ्या गजऱ्याची माळ तुम्ही तोडणार का तुम्ही तोडणार का
तुमच्या साठी खोचलाय केसात
केस तुम्ही हो विस्कटणार का राया विस्कटणार का
माझ्या या गळ्यात माळ तुमची
गालावर खळी तुमची
ओठावर लाली तुमची
सांगा राया आज विस्कटणार का विस्कटणार का
तुमच्या साठी आज सजले राया तुमच्या साठी मी सजले
हात तुमचे मानेवरी अलगद फिरवणार का राया फिरवणार का
राणी मी तुमची अहो राया वाट पाहतेय या हो तुमची वाट पाहतेय राणी मी तुमची.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment