सुखाचे सोबती ✍️
सुखाचे सोबती
सुखाचे सोबती! मित्र गण गोत्र!
आनंदात सूत्र! शुभ लाभ!!1
चिकटती नाती! वाटतं ती किती!
शुद्ध सारी नीती! सुख साथी!!2
संकट समई! आरोळी दया मग!
तेव्हा कळे जग! सारी नाती!!3
आपलं कोणीही! कामात येईना!
दुःख ते वाटेना! असण्याचं!!4
सुखाचे संगती! गायपचं होता !
शिकवण देता!आयुष्यात!!5
प्रदीप सांगतो! क्षण घ्या जगून!
जीवन भोगून! संम्पतच!!6
प्रदीप पाटील
गणपूर( जळगाव )
मो. 9922239055
Comments
Post a Comment