गृहलक्ष्मी ✍️
गृहलक्ष्मी
गृहिणी घरची! कामात असते!
कर्तव्य करते! सारं काही!!
सर्वांची काळजी!कार्यात तत्पर!
शाळेला दप्तर! मुला देते!!
कुटुंब सांभाळ! गळ्यातली माळ!
पतीचा सुकाळ!धागा बांधी !!
पहाटे जुपते! रात्री हि थकते!
पाठीत वाकते! कष्ट करी!!
दोन कुटूंबात! असते सलग्न!
कार्यात ती मग्न! सर्वा साठी!
सरस्वती लक्ष्मी! तिच्यात भरली!
सौभाग्य नटली! पतीसाठी!!
अंगणी तुळस! सत्वात भासली!
तत्व जोपासली! घरासाठी!!
जीवन संगिनी! असे अर्धांगिनी!
प्रदीप ते जाणी!गृह लक्ष्मी!!
प्रदीप पाटील
गणपूर.जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment