सागर किनारा ✍️
सागर किनारा
सागर किनारा! सुंदर पसारा!
वाहतोय वारा! भरभर!!
संध्यालाचं दिसें! मावळता सूर्य!
वाटतं पाण्यात!डुबतांना!!
मोहक सौदंर्य! संथ जल सारा !
वाळूचा पसारा! चोहीकडे!!
शंखात शिंपले! खेकडे हो वाढे!
भासतं निराळे! किनाऱ्याला!!
धडकती लाटा! आदळत असे!
खवळली दिसें! समुद्रात !!
अथांग सागर! लाभला किनारा!
मोहक नजारा! धरतीला!!
प्रदीप बघतो! दुरून डोळ्यांनी!
मनात कळ्यांनी! फुले सारं!!
प्रदीप पाटील
गणपूर( जळगाव )
मो. 9922239055
Comments
Post a Comment