नित्य वारी माझी ✍️
नित्य वारी माझी
वारी संग रमे! नाम घेत मनी !
हृदही कान्हा! बालपणी!
पांडुरंग हरी ! उभे विटेवरी!
लेक सेवा करी! मायबापा!!
देव त्यात दिसें! उमटति ठसे!
पांडुरंग हसे! भक्तीवर!!
दिला त्यानं वर! कार्यात सत्वर!
सरस्वती स्वर! लिखाणात!!
कर्म पांडुरंग!स्मरर्तो श्रीरंग!
प्रभू नाम दंग! सदोदित!!
बीज अंकुरत ! हिरवं करितों!
दाण्यात भरतो! कणसांना!!
विठ्ठल रुक्मिणी ! अतरंगी वसे!
हृदयातचं दिसें! सदोदित!!
सदा सर्व काळ! शब्ददिप माळ!
कीर्ती होई वाढ ! अभंगाने !!
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment