पंढरपूर वारी ✍️
पंढरपूर वारी
चालली चालली!वारी पंढरपूरी!!
भेटण्या विठ्ठला ! त्याला घरी!!
उभा विटेवरी! वाट पाहतोय
भक्त तुमी होय! वारकरी !!
भेटण्याची आस! दोघांनाहि खास
भक्त देवतास ! एकादशी
भजन कीर्तन! गात गुण गान!
देवा अभिमान! भोळा भक्त
बाल साधु संत! जात धर्म पंत
जेवता निवांत! एक ताटी!
होता गाठी भेटी! यात्रा भरे मोठी
चंद्र भागा थाटी ! जलधार !
विठ्ठल रुक्मिणी! भेटण्याची वारी
शब्ददिप वरी! लिखाणात!!
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment