वारी माझी ✍️
वारी माझी
हिरव्या रानात सांगतो कानात
भरते मनात! पीक पाणी
कामात असता सदैव दिसता
हृदयी वसता! पांडुरंग
नामात असतो चौफेर भासतो
अवती भवती! विठुराया
जरी काळी काया धरणी फुलवी
सृष्टीत फिरवी! जीव सारी
भक्ती मध्ये शक्ति सांगतो प्रदीप
कर्म हि पंढरी शब्ददिप ©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment