वाट ✍️

 वाट 


कुठं दिसे हिरवं रान, मन होई बेभान 

वाटतं व्हावे रममाण, मनसोक्त छान 


पशु पक्षी प्राणी,सार्यांची गुंज उठे मनी 

वाटे गाताय सारी, मजूळ गित गाणी 


व्हावे धुंद आपणही, म्हणावीत प्रेम गाणी 

मनात वाटेवरील , सुंदर भरूयात आठवणी 


क्षण क्षणात बदले वाट, कधी कुठं येईल घाट 

रस्ता वळणांचा सारा,कधी वाटतो शुकशूकाट 


प्रवास हा असाच सारा, भरभर वाहतो वारा 

मन चोहीकडे फिरे, कधी घेऊ थांबा जरा.


वाटा साऱ्याचं वेगवेगळ्या, पण पोहचतात सगळ्या 

  आपल्या गंतव्य ठिकाणी ,देऊन वाटेवरच्या आठवणी वेगळ्या .


प्रदीप पाटील 

गणपूर जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे