सण ग्रामीण पण झाला शहराचा ✍️
सण ग्रामीण पण झाला शहराचा.
सण दिवाळी खूप जोरात उत्साहात फटाक्याच्या आतिषबाजीने साजरा होणारा सण. भव्य दिव्यांची रोषणाई. आकाश कंदील,लाइटिंग ने सजलेलं शहर.असं चित्र चोहीकडे. दिवाळी आली कि दिसतं. सुका मेवा, मेवा, लाडू, मिठाई,पंचपकवांन्य, विविध तेलात, तुपात तळलेले शेव पासून ते चकली पर्यंत विविध अंनत गोड ते तिखट आंबट सारी फरसाण. या साऱ्यांची रेलचेल. आनंद साजरा करण्याचा सण. पूर्वी दिवाळी परंपरा या लेखात कुणब्यांची खरी दिवाळी सुरवात अन उत्सव मी लिहले होते. त्या लेखात सारे बाराबलुतेदार खरे दिवाळी सूत्रधार. कुणब्यांच्या वरती आधारित बलुतेदारी चाले. शेतकऱ्यांनी पिकवलं ते गाय गोरस च्या दिवशी गाईला पहिल्या कणसातील धान्य किंवा रास पुजन झाल्यावर पहिलं दळणं आपल्या गाईला आणि गोऱ्याला पूजा करून दिवाळी पहिला दिवस उत्साहात साजरा करायला सुरवात करायचीत मग नंन्तर आलेल्या धान्य मधून ईतर फराळ बनवतं. नंन्तर इतरांना देत असत तीच परंपरा सुरु आहे. पण फरत इतका झाला शेतकरी शिल्लक राहिला फक्त सण करणं विसरून गेला नव्हे विसरत चालला. बलुतेदार त्याला एक एक करून सोडून गेलेत.आधुनिक काळात सर्वांनी शहर जवळ केलं अन बलुतेदार श्रीमंत झाले. कुणबी कुणबी राहिला. शेतकरी शेती मातीत राबत कसत राहिला.कधी फासावर लटकट राहिला .त्याला कळले नाही आधुनिक कास धरावी आणि उधोग,नोकरी, लबाड पुढारी बनावं, पुढारी बनला शेतकरी पण सच्चा काही आजच्या बाजारात टिकला नाही. लबाड होते ते नेते झाले. शेतकरी कुणबी नेते पण शेतकरी हीत काही बघितलं नाही वरती गेलेल्या कुणबी किंवा ईतर नेत्यांनी. शेती मध्ये राबत राबत थकला शेतकरी अन दिवाळी उत्साह ग्रामीण भागात कमी झाला. ज्यांची दिवाळी ते उपाशी राहु लागलेत पिकलेलं अन्न शहरात भरमसाट येऊ लागलं. शहरात खाद्य पदार्थ रेलचेल तर ग्रामीण भागात तोडकी मोडकी दिवाळी. करायचं म्हणून करायचं अशी साजरी होऊ लागली.आकाश कंदील लावणं शेतकरी विसरून चालला गोड धोड, मेवा मिठाई बनवणं विसरून चालला. पहिला दिवस गाईला खाऊ घालतो दुसऱ्या दिवसा पासून बळीप्रतिपदा,धनतेरस, घरातील धान्य पूजन, लक्ष्मी पुजन, वही पुजन, भाऊबीज, पर्यंत सण. पण उत्सव उत्साहात साजरा नं होता ग्रामीण भागात दिवाळी राहिली नाही. तर दिवाळी झाली शहर वासियांची आनंद हा आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य शहरात वसलीत. जी गावात राहिलीत ती राबत राहिलीत त्यांच्या जीवनात सणाचा उत्साह कमी झाला. शहर म्हणजे आधुनिक अन गाव म्हणजे अशिक्षित सारखं वाटतं. गाव म्हणजे गरीब शहर म्हणजे श्रीमंत असं झालं. गरीब गावात उरला बाहेर पडला तो श्रीमंत बनला. तरी पण बहुसंख्य ग्रामीण आजही शहरात गावा सारखीच राहतात. गाव शहर हि दरी दिवाळी मध्ये दिसते.गावाची दिवाळी अंधारात कुठं तर घरचा लाईट, दिवा , लावुन साजरी होते तर तीच दिवाळी शहरात रात्री तारे चमकवणारी स्वच्छ प्रकाश धुर सोडणारी लख्ख लखलखाट करणारी चमचम झमझम आत बाहेर असं वातावरण. विरोधाभास वाटतो कधी ऐकीकडं पैसा बरबाद करणं तर दुसरी कडे पैसा कुठून आणायचा हया विवंचणेत ग्रामीण असणं. ज्याचा उत्सव तो कोरडा. ज्यांचं अन्न ते उपाशी. ग्रामीण भागातील शेतकरी यांनी आधुनिक कास धरली पाहिजे. बळी चा बळी वामनाने दिला त्या दिवस पासून बळी हा "इडा पीडा टळो बळी चं राज्य येवो " जीवनात सुख शांती समृद्धी येवो हेच म्हणतो. पण दृष्ट वामन खोटं बोलून जसं बळी राज्याला फसवलं तसंच आजच्या बळी ला रोज सारे फसवतं असतात. त्याला लुटतं असतात. अंनत वामन फसवून शेतकरी राज्याचे साम्राज्य रोज लुटतात. त्याला रोज कोणीतरी फसवतं. व्यापारी, पुढारी, नोकरदार, भ्रष्टाचार करणारी सर्व सर्व बळी ची पोरं बळीवर उलटलीय म्हणून बळी ची दिवाळी कोरडी. वामन सारखं खोटं बोलणाऱ्यांची भ्रष्ट लोकांची दिवाळी जल्लोष मध्ये असंच कधी जनतेला वाटतं. वामन आणि बळी हि वृत्ती म्हणून घेतलीय वामनी वृत्ती हि खोटारडी फसवणूक करणारी वृत्ती तर बळी हि कष्टकरी घाम गाळणारी न्याय नितीने धर्म प्रिय धार्मिक लोकहीत बघणारी. दिलेला शब्द पाळणारी जमात म्हणजे बळी शेतकरी . धार्मिक अंग देऊन फसवणूक करणं हि वामनी वृत्ती. सामाजिक किंवा राजकीय संदर्भ लावु नये. ग्रामीण भागात अंधःकार दुष्काळ सदैव पाचवीला. पिकलं तर कमी भावात. जितकं पिकवणाऱ्याला मिळतात तितके पैसे त्यांच मालावर एक दिवसात इकडून तिकळे पाठ्वण्याचे व्यापारी लोकांना मिळून जातात. एक दिवसात दाम दुप्पट व्यवहार व्यापारी करतो. आपला विषय दिवाळी सणावर आहे. लुटण्यावर नाही. एकीकडे उत्साह दुसरीकडे अंधार म्हणून लिहावं लागलं. तसं पाहिलं माझ्यामनात जे आलं तसं भेदभाव करता येणार नाही शहरात खूप कष्ट करून जल्लोष साजरा करता असं हि असु शकतं. मायावी नगरी ते छोटी मोठी अंनत गुणवंत मंडळी सुद्धा शहरात आहेत. पैसा कमवण्याचे साधनं खूप उपलब्ध शहरात आहेत एक नंबर उधोग तसं दोन नंबर उधोग म्हणून उत्सवात उत्साह आहे. गावात नुसतं शेती म्हणून ग्रामीण भाग ग्रामीण भकास होतं आहे.अंनत पैसा कमवण्याची ्तोत्र शहरात आहेत . शेतकऱ्यांचा खरा सण पण बिकट अवस्था हे मात्र खरं. दुष्काळ, नापिकी, वादळ वारे सर्व त्याच्या नशिबात म्हणून लिहण्याचा प्रपंच.
शहर ग्रामीण दरी निर्माण नं होता गाव सुद्धा आधुनिक झालं पाहिजे हाच या मागील उद्धेश. शेतकऱ्यांनी लढायचं आधुनिक कास धरतं शहर गावाकडे कसं बघेल मान उंच करून इथपर्यंत शेतकऱ्यांची उंची पोहचो हया मनोकामना आधुनिक कास अंगीकारत गाव खेडे श्रीमंत शहर सारखं लक्ख झालं पाहिजे.
तमाम जनतेला दिवाळी सणाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment