युद्धाचे बदलते स्वरूप ✍️
!! युद्धाचे बदलते स्वरूप!!
काळ नुसार युद्ध स्वरूप बदलते. आपण प्राचीन काळ पासून आजपर्यंतचा जसा मानव क्रांती प्रवास तसाच लढण्याचा प्रवास. टोळी युद्धा पासून सुरु झालेलं युद्ध. सुरवात पहिलं मोठं युद्ध रामायणात राम रावण युद्ध. रामायणात राम सोबत पशु, पक्षी, वानर सेना युद्ध लढली मानव विरुद्ध वानर सेना असं युद्ध झालं. म्हणजेच प्राणी, पशु,पक्षी एकमेकांना साथ तत्त काळी दयायचे. भाषा समजायचे असो तो मुद्धा येथील नाही. नंन्तर महाभारतात तसं पाहिलं तर जागतिक पहिलं युद्ध महाभारतात जगातील पहिलं महायुद्ध असंच मी म्हणेल. का तर जगातील सर्वच राज्यांनी आपल्या आपल्या सेना कुरुक्षेत्रावर कौरव पांडव यांच्या साठी युद्धात पाठवल्या होत्या. म्हणूनच जगातील सर्व राजेशाही जर आपली सेना युद्धात उतरवत असेल तर तेच पहिलं जागतिक युद्ध महाभारतातील. भारत भारतीय जनता सोडून ईतर जनता ते मान्य करणार नाहीत पण . पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध आधुनिक काळातील आपण बघितलीत. त्या पूर्वी राजे महाराजे याची युद्ध आपण वाचलीत कश्या पद्धतीने होतं होती. तलवारी ते तोफगोळा पर्यंत हत्यार आलीत. दगडाचं हत्यार वापरून सुरु झालेला प्रवास मिसाईल,ड्रोन पर्यंत कधी कसा हळूहळू माणुस बदलत गेला तसं युद्ध तंत्र सुद्धा बदललं. देव राक्षस युद्ध तर मंत्र तंत्र वर चालायचं असं पुराण कथा सांगतात.हा झाला इतिहास वर्तमान काळ अन भविष्यात युद्ध तंत्र खूप बदललं बदलत जाणारे कल्पना करु शकणार नाही या पद्धतीने लढलं जातंय अन जाईल. मानसिक युद्ध पासून सुरवात होऊन माणुस कसा हतबल, अधू,अपंग, घरी बसल्या शस्र न चालवता केवळ बुद्धी च्या जोरावर युद्ध खेळलं जाईल.तर मानवी मनातील सर्व तंत्र वापर करतं सायबर युद्ध ज्याला म्हटलं जातं ते अतिशय भयानक रूप या सायबर तंत्राचे कुठं यंत्रात तांत्रिक बिघाड करतं सम्पूर्ण यंत्रणाचं तंत्र कोलमडून टाकणारे असंच युद्ध. परकीय देशातील सामुग्री कोणतीही नुसतं संदेश भ्रमित करून नामशेष करु शकतं सायबर. ड्रोन च्या नवीन नवीन व्हर्जन विकसित होतं आहेत. अगदी डोळ्यानं नं दिसणारं ड्रोन यंत्र शत्रू राष्ट्र वर प्रहार करु शकतं असं तंत्र विकसित होतंय. रोबोट सुद्धा मानवाची युद्ध लढण्याची जागा घेतंय. चीन या देशाने रोबोट गेम शो भरवला होता. का तर देशाची रोबोटीक ताकत दाखवण्यासाठी विविध तऱ्हा विकसित होताय. शत्रू देशातील जनता जैविक किटाणू सोडून नामशेष करता येईल इथपर्यंत जैविक क्षमता विकसित केलीय मानवाने. सेटलाईट निगराणी करतं शत्रू देश हालचाली टिपत शत्रू राष्ट्रावर सायबर प्रहार करतं यंत्रणा कोलमडून टाकत हल्ला करायचा विविध तंत्र वापर सध्या युद्धात सुरूय. जल,जमीन,पाणी, हवा, यातून उलथापालथ करून नं दिसता शत्रू राष्ट्रातील साधनं नामशेष करायचं तंत्र विकसित होतंय. केवळ पूर्वी सैनिक मारले राजा मारला कि युद्ध जिंकून घ्यायची राजे. आता तसं राहिलं नाही. अणू,रेणू पासून युद्धात सामुग्री तयार केली जाते उतरवली जातेय. आपण कल्पना करु शकणार नाही असं युद्ध तंत्र सध्या विविध मार्ग अवलंबत लढलं जातंय आणि जाईल. नुसते प्रकाश किरणं सोडून सुद्धा शत्रू राष्ट्रात हाहाकार माजवु शकणारे रेजर किरणांनी नुकसान करतं आग लागु शकेल असं दिसतं. पुराणात जसं मंत्र होतं अगदी तसंच यंत्र येऊ पाहतंय सुष्म ते अवाढंव्य. क्षणात नाश हजारो लोकं नामशेष होतील अशी सामुग्री अणूबॉम्ब सारखं तंत्र विकसित होतंय. नवं नवीन शोध युद्धात वापरले जाताय.आपण सध्या बघतोय ड्रोन पाठवला कि जीवन आवश्यक ढाचा उध्वस्त करून टाकायचा.शत्रू सैनिक ठिकाणी लक्ष करतं जागच्या जागी सैनिक मारायचे.असं जल, स्थल,आकाश सर्व, भुभाग व्यापणार असं सुष्म वाटणारी यांत्रिक सामुग्री पण भयावह रूप तंत्र यंत्र युद्ध. युद्ध युद्धाचे स्वरूप बदलतंय हे मात्र निश्चित.
दिवाळी अंक वाचक सर्व मराठी वाचक यांना दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment