माझी बोली माझी कविता ✍️
|| माझी बोली माझी कविता
अहिराणी कविता ||
(बोली अहीरानी चाली)
खान्देसनी गावरानी
भाषानी रानी अहिरानी
मनमाई उनी दखा
तुमले वाटलाई दिनी.
दयन दये माय मनी
घट्यावर गाना वोव्या म्हनी
पायठाले बोलें उठीसनी
आंगनमा सडा रांगोई टाकीसनी.
जंगलना राजा देस
आठे लोकसले शे माया
त्या भलताच शेतस भोया
देव त्यासना शेत सोया.
गावमा ऱ्हाये मढी, गडी
तठे सोनानी हलकडी
ऱ्हायेंत टांगा बैलगाडी
पोया नी धुम देतस गाजाडी.
हुई ना खेयतस फाग
येत नई कोनलेच राग
दाटीवाटीना पहाड ऱ्हाये वाघ
कानबाई गोंधय जागोजाग.
जातधरम घरमा पायेंत
एकन्दर नांदतस लोके गुनी
राम नी पावन व्हयेल शे
सर येवाव नहीं खांन्देसनी.
______________________________
प्रदीप मनोहर पाटिल
गाव. गनपूर तालुका चोपडा जिल्हा जयगाव.©️®️

Chaan
ReplyDelete