मधमाशी

 || मधमाशी ||


जीव कीटक जातीतील  
जाती प्रजाती अनेक यातील
राजाराणी सैनिक यातील
कामकरी भ्रमणावर त्यांच्यातील…

  
परागकण गोळा करती
पोळे झाडावर बाधती   
राणी राज्यं करती
साथ सारी जमात देती…

  
मग्न असतात कार्यात
नाही त्रास कुणास  
ध्यास मधाचा यास
 साठवणं बांधून पोळ्यास…

जाती असतात सामाजिक
होता स्पर्श वनस्पतीस  
फलधारणा होते स्पर्शतून 
गोड मध सृष्टीस…

अविचारी मानव काही
औषध मध यांचे
जाई कधी घेण्यास  
धुराड्यात हाल  त्यांचे…

घाबरून  पळती सारी
सैनिकमाशी तुटुन पडती 
डंक मारती तोडणाऱ्यास  
तरी सोडुन पळती

सोडले सार्यांनी घर
 वैशिष्ट्य आहे धरती.
  शोधती जगंलात पाणी
 डुंबुनी अंघोळ करती…

नंन्तर सारी जमती
नवंनिर्मिती दुसरीकडे करती
पुन्हां कार्यमग्न होती
नवं साम्राज्यं उभारती…

मध देतातं या
त्रास घेतात त्या
आयते मिळते आपणांस
सोसतात तरी त्या…

गुण अनेक मधाचे  
उपकार सारे मधमाशीचे  
मदत सृष्टीस इचे  
जिणे तसंच तीचे…

 
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे