महामानवाची गौरव गाथा ✍️

 


महामानवाची गौरव गाथा 


गाथा होई मोठी! म्हणून कविता!

त्यात त्यांच्या कथा! जन्मदिनी!1


शिक्षण दुर्देशी! राहिले विदेशी!

निष्ठा भु पायाशी! कष्टातून!!2


राखेतून घेत! कर्तृत्व भरारी!

वागणं करारी! कर्तृत्वान!!3


व्यथा त्या जानिल्या! लढा उभारला!

 मनु तो जाळला! सर्वासाठी!!4


मंदिर उघडं! सर्वा लोका साठी!

 पाणवठ्या साठी! झुंझलेत !!5


मोडत बंधन!सारी जाती पाती !

जेवण संगती! मंडपात !!6


पुस्तकं साहित्य! शिकेल टिकेल!

शिक्षण भेटेल! लेकरांना!!7


क्लिष्ट रूढी प्रथा  ! मोडीत काढल्या!

एकीत वाढल्या! जातीधर्म!8


सांगे प्रदीप हे! गुण साहेबांचे!

 महामानवांचे! अभंगात !!9©️®️



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे