बाप ✍️

 


बाप 


पोटात लपवी! हृदयात साठवी!

दुःख ते पचवी! हसवत!!1


कष्ट करी खुप!सोसून त्या झळा!

सोसत ते कळा!स्वतः साऱ्या!!2


ऊन वारा पाणी ! घेत अंगावर!

चिंब घाम फार! ओले होतं!!3


सांभाळ साऱ्यांचा! आधार घरचा!

खांब ते मायेचा! वडीलचं!!4


 कुटुंब रक्षक!ते जीवनभर!

आणी घर वर! कष्टातून!!5


डोळ्यात काळजी! साठवे आतंच!

पिकवे शेतचं! बाप माझा!!6


राबे दिनरात!कष्ट जीवनात!

सत्य मार्ग वात ! स्वमनात!!7


सांगे नं ते दुःख! आम्हा देत सुख!

झाले तेच राख! गेल्यावर!!8


सांभाळत सारा ! सोडला पसारा!

जमा केला सारा! संम्पतीत!!9


बाप माझा देव! नीती हिच ठेव!

जीवनात भाव! मुलालाच !!10


त्याच्या मुळे जीव! येतो पृथ्वी वर!

करतो तो घर! संसारात!!11

©️®️



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव.


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे