भारतरत्न ✍️
भारतरत्न
हिरा होते बाबा! तेज त्यांचं खुप!
नीती धर्म रूप! जीवनात!!1
मार्ग तो बिकट ! संघर्ष करतं!
जीवन जगत! हुशारीने!!2
धडा दिला जगी! झाले तेच त्यागी !
सत्य सारं वागी ! माणसात!!3
शिक्षण करतं!लिहलं साहित्य!
वाचत ते नित्य! सदोदित!!4
अभ्यास दांडगा! कर्म धर्म सांगे!
शांती मार्ग वागे! धर्म ज्ञान!!5
कायदा लिहला!सर्वोच ठिकाणी!
देश अभिमानी! झाले मानी!!6
सन्मान दिलाय! हो भारतरत्न!
सारं कर्तृत्वानं! साहेबांना!!7
स्वतंत्र देशात!अध्यक्ष समिती!
वापरली नीती!कायदयात!!8
सांगे संविधान !अंगीकार सारा!
चौफेर दरारा!देशभर!!9©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055


Comments
Post a Comment