संस्कार अन संस्कृती बदलाच्या मार्गांवर.
संस्कार अन संस्कृती बदलाच्या मार्गांवर.
पूर्वी कुटुंब व्यवस्था खूप मोठी होती. घरं होती त्यात घरपण होतं. कारभारी कारभारीण जसं सांगेल तसं एकत्रित कुटुंब पद्धतीत चालतं असे. अंत्यत सुयोग्य उत्तम घरात सर्व संमत काटकसरीत काटेकोर लहान थोर सन्मान आदरणीय आदर भाव जोपासत सर्व चालतं असे. अंगणी तुळशी घरात देवघर देव्हारा सडा रांगोळी सुसंस्कृत असं घर घरपण ग्रामीण भागात होतं. गाव खेड्यात गावकी भावकी जातीपाती होत्या जातीभेद नव्हते. धर्म होते पण धर्मभेद नव्हते असा सुस्थितीत चोख कारभार सर्वीकडे दिसें. दुसऱ्याचं सोनं पडलेलं राहील त्याला कोणी हात लावत नसे असा. उत्तम संस्कार पूर्वी होता जे असेल ते स्वतःचं असेल तेच माझं. सुख होतं समाधान होतं. आहे त्यात मान होता सन्मान होता. गरीब असो वा श्रीमंत दरी दिसतं नव्हती सारे समानतेत आपल्या आपल्या पायरीनं वागत असतं. वडीलधर्यांचा सन्मान करतं असतं. मग तो आपला असो वा परका. जातीचा असो वा नसो. मोठयाला मोठं म्हणतं वडीलधारी यांचा आदर करतं.ही विविधता होती पण विवीधतेत एकता होती. इंग्रज आले अन आधुनिक वारे वाहू लागलेत. तेथेच संस्कृती बद्धलाचे वारे वाहू लागलेत. देशात पाशात्य संस्कृती पेक्षा आपली संस्कृती आपल्या येथे सर्व गुण अवगुण संपन्न येथेच सारं होतं. पण जो तो ज्याच्या त्याच्या जातीत,कुटूंबात, धर्मात, वस्तीत, भावकीत, गावकीत, आपलं वेगळं अस्तित्व पण आपलं स्वतःचं अस्तित्व जपून दुसऱ्या प्रति आदर भाव ठेवून. आपलं घर कुटुंब परंपरा जपून दुसऱ्या प्रति आदर ठेवतं असतं. दुसऱ्यांच्या प्रथा परंपरा बद्धल कधीच ढवळाढवळ करतं नसतं. पाश्चात्य संस्कृती मध्ये जे आहे होतं ते सारं येथे पण होतं पण त्या कडे कोण लक्ष देत नसे जो तो आपल्या आपल्या परंपरा धर्म, जात,पंथ,पाळत असे पण तरी माणुस माणुसकी मूल्य जपत असे. आपली स्वतःची जगण्याची पद्धत होती सर्वांची. त्यांच पद्धतीने जगत असतं. इतरांची पद्धत कमी लेखत नसतं सर्वांना आपल्या स्वतःच्या जगणाच्या पद्धतीचा अभिमान होता. मग ती पद्धत कशीपण असो. स्वतःच्या जगण्याच्या कुटुंब पद्धतीचा अभिमान बाळगतं अन इतरांच्या पद्धतीत कधीच नाक घालतं नसतं. किंवा चांगलं वाईट म्हणतं नसतं सर्व समान सारखेच वागतं असतं. योग्य सन्मान सर्व सर्वांना देतं असतं असंच वाटतं. साधा गावकामगार हा त्याची पायरी नं वागतं असे. त्याच्या जगण्यात कोणीही हस्तक्षेप करतं नसे. ईतर सारे त्याच्या सुद्धा सुख दुःखात सारेच गावकरी एकत्र येतं असतं. आपला मान आपल्या घरी पण इतरांच्या सुख दुःखात सारेच गाव कुटुंब म्हणून सारेच सोबत असतं. ईतर सारे बाराबलुतेदार गरीब असो वा श्रीमंत सारे एकदीलाने वागतं राहतं असतं. सारे साऱ्यांचा मान सन्मान करतं. जो तो ईतर जातीधर्म सोबत राहुन सुद्धा कधी दुसर्यांचा तिरस्कार किंवा उंच नीच भेदभाव करतं नसतं. जो तो आपलं आपलं सांभाळत असे. दुसऱ्यांच्या कुटुंब पद्धतीत कधीच डोकावत नसे. खुप छान विविधतेतून एकता होती सर्व्हिकडं. पण आधुनिक वारे आले अन कुटुंब राहण्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. एक मेकांच्या पद्धती सुद्धा लोकशाही राज्यात एक होऊ लागल्यात. एकमेकांना कमी जास्त लेखू लागलेत लोकं. जातीभेद होऊ लागला. सुख दुःखात येणं जाणं कमी झालं. इतरांच्या बद्धल व्यवस्था वागण्या बोलण्याची बदलली असंच मला वाटतं. कुटुंब वागण्याच्या पद्धती सारख्याच होऊ लागल्या कुटुंब एक होऊ लागलेत असं वाटतं असतांना. एकमेकांचे रोटी बेटी व्यवहार सुद्धा सध्या होऊ लागलेत. पण जगण्याची बद्धत एक झाली अन वागण्याची पद्धतमध्ये खुप मोठी दरी झाल्यासारखं वाटतेय मला तरी. माणसं जवळ आली पण माणुसकी सोडुन. कुटुंब एक झालीत पण मन कुलुशीत करून. जाती एक झाल्या असं कधी वाटतं पण जाती द्वेष मनात ठेवून. आधुनिक झालेत की अनपढ तेच कधी समजतं नाही. बुद्धी आली तितकीच बुद्धी भ्रष्ट पण झाली. न्याय आला पण नीती गायप झाल्यासारखी वाटते. आधुनिक लोकं झालीत पण सारं विसरून आधुनिकता काही कामाची नाही असंच मला वाटते.संस्कार संस्कृती एक झालेत. पण संस्कार संस्कृती विसरून एक झालेत. घरं विखूरली घरपण गेलं. नातं जोडलं गेलं नात्यात वीण गेली. धर्म,जात,पंथ, विसरली पण मुलगी मुलगा एकमेकांशी प्रेमात जवळ आलेत जात धर्म विसरून त्यांच सोबत माणुसकी सुद्धा विसरून.द्वेष सोबत घेऊन जवळ आले असंच वाटतं. संस्कृती बदलली पण संस्कार विसरून असंच वाटतं. पूर्वी दोघं एकत्र होत्या आता एकच आहे. एक गेली सोडुन. लिहण्यासारखं खुप आहे यावर तूर्तास इतकंच बस.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment