वैभवशाली मराठी भाषेला क्षीण करणारे दगाबाज कोण.

 वैभवशाली मराठी भाषेला   क्षीण करणारे दगाबाज कोण.


 क्षीण होऊ पाहतेय आज मराठी भाषा. महाराष्ट्र आणि जगात हळूहळू मराठी जनता पसरली त्या सोबत मराठी सुद्धा जगात सर्वदूर जाऊन पोहचली असं वाटतं असतांना मनात विचार आला तसं पाहिलं तर मराठी लोकं पोहचलीत सर्वदूर पण मराठी कमी पोहचली त्या मानाने असंच वाटतं. मराठी माणसांच्या मुलखात दुसऱ्या प्रांत देशातील लोकं आलीत तर मराठी बोलणं विसरून मराठी लोकं समोरच्याची भाषा बोलु लागतात. हाच मोठा दोष आहे मराठी माणसाचाचा समोरचा माणुस पर प्रांतातून,परदेशातून येऊन सुद्धा आपली भाषा सोडतं नाही बोलतांना तीच भाषा बोलणं पसंत करतो. तर इथला माणुस स्व भाषा सोडुन दुसऱ्यांची बोली बोलु लागतो त्यातून स्वतःचं हसं करून घेतं असतो.तरी इतरांची बोली बोलु लागतो त्याला समजावी म्हणून. मोठा दोष आहे मराठी माणसातील असं वाटतं असो. जग बदलतंय पृथ्वीवर अंनत बोली अस्तित्वात आहेत. पण तरी जगातील हुशार जनता आपलं स्वतःचं हक्काचं असं काहीच सोडतं नाही. पण मराठी माणुस स्वतःला विसरून जगाला अर्पण करायच्या भानगडीत स्वतःला विसरतो. आपली असलेली बोली जात धर्म सुद्धा बाहेर गेला तर मराठी माणुस सोडून देतो. तेथलीच भाषा संस्कृती अंगीकार करतो. हे मराठी माणसातील गुण समजावे की दोष तेच समजतं नाही. पृथ्वीवर प्रगत देश प्रगत का झालीत तर त्यांनी सर्वात अगोदर भाषा समृद्धी प्रगत केली. जगात स्वतःची भाषा ईतर देशात शिकवायला नकळतं भाग पाडलं. अन आपली भाषा पृथ्वीवर सर्वदूर समृद्ध करू लागलेत. उदा. इंग्रज देशात आलेत त्यांनी इंगजी देशात पसरवली रुजवली त्यांची बोली सोडली नाही येथली कोणतीच भाषा अंगिकारली नाही. म्हणजेच इतक्या लांब येऊन येथील जनतेला त्यांची भाषा बोलायला भाग पाडलं पण येथील कोणतीच बोलीभाषा शिकले नाहीत म्हणून जिथे पण गेलेत तिथं त्यांचं वरचस्व कायम राहुदिले. तसंच इंग्रज, नंन्तर फ्रेंच, पोर्तुगीज यांनी सुद्धा पृथ्वीवर अनेक ठिकाणी राज्य केलं आपल्या वसाहती वसवल्या पण आपलं मूळ सोडलं नाही की आपली बोलीभाषा सोडली नाही. या उलट अंगीकार मराठी माणसाचा तेथलं लवकर आत्मसाद करतो अन स्वतःचं सारं विसरून जातो. स्वतःचा देश, प्रांत, घरदार सुद्धा मग विसरून जातो मराठी माणुस असंच कधी वाटतं मग मराठी समृद्ध भाषा अजून समृद्ध होण्याच्या दिशेने कशी वाटचाल करेल. तर मराठी स्व विकास खुंटतो. 

त्यांच प्रमाणे शिक्षण व्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे असंच वाटतं कधी. मराठी सोडून ईतर भाषेतील शाळेत जाण्याचा कल सर्वदूर देशात दिसतो. स्थानिक भाषा लयास नेण्यास सरकार कारणीभूत आहे हेही त्यातील मुख्य कारण. त्या त्या प्रांतातील भाषिक शाळा बंद करून इंग्रजी अन ईतर भाषा माध्यमाच्या शाळा सुरु करून. स्थानिक शाळा ओस करून बंद करण्याचा राजकीय राजकारणी लोकं सर्व्हिकडं करतांना दिसतात. सरकारी शाळा स्थानिक भाषा शाळा बंद करून स्वतःचं व्यावसायिक राजकीय लोकांच्या शाळा कमाई करण्यासाठी ईतर भाषा उदोउदो करून ईतर भाषा जाहराती करून प्रांतीय भाषा मोडीत काढण्याचं पाप प्रत्येक राज्यातील बाजारू नेते स्वतःच्या शाळेचा बाजार मांडून सरकारी शाळा बंद करून स्वतःची तिजोरी भरण्याचं काम हि मंडळी करतांना भारतात चोहीकडे दिसते. "जनता मरो पण खिसा भरो" हाच उधोग देशात सुरूय. लोकांच्या खिश्यातून पैसे काढण्यासाठी स्थानिक भाषिक शाळा बंद करून लोकांच्या पैश्यावर मजा करतं जनतेला लुटतं ईतर देशातील भाषेच्या खाजगी शाळा काढतं असतात स्थानिक नेते असंच आहे. महाराष्ट्र मराठी प्रांत मराठी माध्यम बंद किंवा कमी करून इंग्रजी माध्यम शाळा जास्तीतजास्त नेत्यांनी काढल्या त्यावर  जितका भर देता येईल तितका ते सतत देतं असतात. व्यापारी शिक्षण केलं. सरकारी बंद व्यापारी स्वतःचं दुकान सुरु असंच दिसतं. जनता फी ला पैसे नाही  म्हणून रडतेय, मरतेय तर मरू दया पण पैसे भरा शिका असाच प्रचार व्यावसायिक पुढारी करतांना दिसताय. वरून म्हणताय चांगलं शिकायचं असेल तर पैसा तर मोजावा लागेल. सरकारी माध्यम बंद करून ईतर कमाई माध्यम सुरु करणं हा मराठी मागे पडण्याचा खुप मोठा मुद्धा आहे. पालकांची दिशाभूल करून त्यांची मानसिकता व्यवस्थित बदलवून सारं स्वतःच्या खाजगी शाळेचं बस्थान बसवणे सर्वांचे सुरूय. महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांच्या संस्था आहेत. तेच खाजगी शिक्षण दुकानं चालवतात म्हणून सरकारी बद्धल अनास्था भ्रम त्यांनीच पसरवला जनतेत. सरकारी शाळा बंद करून स्वतःची संस्था टोलेजंग मोठं मोठाली दुकानें थाटलीत जनतेला लुटायला.जनतेची स्वतःची भाषा विसरायला कारणीभूत नेतेच कारणीभूत अशीच जनभावना झालीय देशात. त्यात मराठी प्रांत अपवाद कसा असेल मराठी भाषेचे कम्बर्ड मोडलं इंग्रजी नेत्यांनी जे मराठी मध्ये पैदा झालेत बोलून शिकून पण इंग्रजी भाषा शाळा गुणगान करणारे काढणारे  वागणारे झालेत असंच कधी वाटतं. लिहण्या सारखं या विषय वर खुप आहे.

मराठी वाढवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतील.

अभिजात दर्जा सरकारने मराठी भाषेला दिला. म्हणजेच मराठी खुप समृद्ध पुरातन प्राचीन भाषा आहे. असं जगमान्य प्रमाणपत्र त्यातून मराठीला मिळालं मराठी माणसाचा मान त्यातुन वाढला. मराठी या पुढे मनुष्य जीव जीवन पृथ्वीवर आहे तोवर टिकली वाचली लिहली गेली पाहिजे म्हणून मराठी अजून समृद्ध होणं टिकून राहणं या साठी मराठी माणसाने मराठी सदैव अभिजात राहावी म्हणून. मराठी वाचन लेखन सदैव व्हावं म्हणून मराठी शाळा सुरु रहाव्यात. मराठी वाचनमंदिर सार्वजनिक वाचनालये सर्व्हिकडं सुरु व्हावीत. मराठी बोलणं लिहणं ती रुजवणे अंगीकार करणे सर्व मराठी माणसांनी करावं असंच वाटतं. साहित्य समृद्ध होण्यासाठी मराठी लेखक, कवी, नवं कवी, कादंबरीकार ई. साहित्यिक यांना सरकार ने प्रोसाहन मदत केली पाहिजे. साहित्य प्रकाशित करण्यासाठी अनुदान भरीव दिले पाहिजे. जेष्ठ साहित्यिकांना भरीव मानधन मिळालं पाहिजे. साहित्य लिहताना साहित्यिक यांना वेळ मिळावा म्हणून योग्य मोबदला मानधन म्हणून दिलं तर लिहणं विपुल होऊन भाषा अजून समृद्ध होण्या मदत होईल असंच मला वाटतं. अंनत मार्ग आहेत प्रत्येक साहित्यिक घटकाला मदत करण्याचे पण सरकार ने मानसिकता बदलली पाहिजे.सर्व मार्गानं मदत केली तर साहित्य वाढेल. साहित्य प्रकाशित प्रकाशन करण्याचा लेखकांने प्रस्ताव दिला तर तो तात्काळ मंजूर करून साहित्य पुस्तकं, कथा, लेख, कविता संग्रह लगेच प्रसिद्ध झाला पाहिजे त्याला लगेच अनुदान मिळालं पाहिजे. विनाअटी शर्थी पुस्तकं प्रकाशित लिहण्या प्रोसाहन अनुदान मिळालं पाहिजे असं मला वाटतं.  उदा. माझं प्रदिपचे विपुल लिखाण असुन अजून प्रकाशित नाही. लिहून पैसा वेळ खर्च करणं साहित्यिक यांना परवडतं नाही असंच वाटतं. वाचक संख्या कमी झाली ती वाढण्या साठी असेच लिखाण प्रसिद्ध होणं गरजेचं.असो तूर्तास इतकंच. 


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे