भोळा शिव शंकर ✍️



"शिव शंकर "


देवांचा हा देव! भोळा तुझा भाव!

घेतो मज ठाव! महादेव!!


ॐ नमः शिवाय! भोळी माझी भक्ती! 

 उभी तुझी शक्ति! मज पाठी!!


नित्य सेवा तुझी! करतोय राजी!

 काळजी घे माझी!तुचं देवा!!


जीवन देतोय! सर्व करतोय!

तु चालवतोय! चक्र सारं!!


कृपा तुझी झाली! उभारी तु दिली!

शरीरात आली! धडधड!!


शंकर पार्वती! एकरूप दोघं!

आवळतो राग! नामघेत!!


जळी स्थळी भासे! चोहीकडे दिसें!

आस तुझी असे! भेटण्याची!!


प्रदीप रोजचं! पुजन करतो!

अभंग लिहतो! तुझ्या मुळे!!



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे